MB NEWS:बीड जिल्हयात मनाई आदेशांना ३० नोव्हेंबर पर्यंत वाढ* *--जिल्हाधिकारी राहूल रेखावार

 बीड जिल्हयात मनाई आदेशांना ३० नोव्हेंबर पर्यंत वाढ --जिल्हाधिकारी राहूल रेखावार



 बीड, दि,३० :- (जि.मा.का.) राज्य शासनाने लॉकडाऊनच्या कालावधीत दिनांक ३० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामूळे बीड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1)(3) अन्वये जे आदेश लागू आहेत त्या सर्व मनाई आदेशात वाढ करण्यात येत असून ते दिनांक 30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत लागू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले.

     जिल्ह्यात यापूर्वी सदर कलमान्वये दिनांक 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत त्यात वाढ होऊन दिनांक 30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत लागू राहतील.

 राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1987 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुण खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनूसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.

*-*-*-*-*-*-*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !