इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

MB NEWS :सर्वसामान्यांना फटका! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार?

 सर्वसामान्यांना फटका! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार?



नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : सर्वसामान्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार (Government of India) पुन्हा एका पेट्रोल-डिझेलवर एक्साइज ड्यूटी (Petrol Diesel Excise Duty) वाढवण्याच्या तयारीत आहे. 3 ते 6 रुपये प्रति लीटरपर्यंत एक्साइज ड्यूटी वाढवली जाण्याची शक्यता आहे.


यापूर्वी सरकारने मे महिन्याच्या दरम्यान, पेट्रोलवर 10 रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर 13 रुपये प्रति लीटर एक्साइज ड्यूटी वाढवण्याची घोषणा केली होती. मे 2014 मध्ये पेट्रोलवर एकूण टॅक्स 9.48 रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर 3.56 रुपये प्रति लीटर होता. तेव्हापासून आतापर्यंत पेट्रोलवरील टॅक्स वाढून 32.98 प्रति लीटर आणि डिझेलवरील टॅक्स 31.83 रुपये प्रति लीटर झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारांद्वारा सतत टॅक्स वाढवला जात असल्याने, क्रूड स्वस्त होण्याचा फायदा ग्राहकांना मिळत नसून, त्यांना पेट्रोल-डिझेलसाठी अधिक खर्च करावा लागत आहे.


पेट्रोलवर लागणार टॅक्स आणि कमिशन -


एक्स फॅक्टरी किंमत - 25.32 रुपये


भाडे आणि इतर खर्च - 0.36 रुपये

 अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीला सामोरे जाण्यासाठी सरकार तिसऱ्या मदत पॅकेजची तयारी करत आहे. अशात सरकारला अधिक फंडची गरज आहे. त्यामुळे सरकार याची भरपाई टॅक्सद्वारे करत आहे. मात्र टॅक्स वाढल्यानंतर, पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढू नये यासाठी सरकारकडून नव्या योजनांवर काम सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या