MB NEWS:आरक्षणासाठी लिंगायत समाज आंदोलनाच्या तयारीत

 


आरक्षणासाठी लिंगायत समाज आंदोलनाच्या तयारीत*                                -

----------------------------------  


    सोलापूर ः लिंगायत समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी लिंगायत महासंघ आंदोलनाच्या तयारीला लागला आहे, अशी माहिती महासंघाचे जिल्हा संघटक सुरेश वाले यांनी दिली आहे.  श्री. वाले यांनी सांगितले की, लिंगायत महासंघाची नुकतीच एक बैठक उदगीर येथे झाली आहे. महासंघाची ही बैठक महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीमध्ये लिंगायत समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भावना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या मुद्यावर लिंगायत समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, यादृष्टीने पुढील काळात आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती भागातील सोलापूर, उस्मानाबाद, लातुर, नादेंड परिसरात मोठ्या संख्येने लिंगायत समाजाचे संख्याबळ आहे. लातुर येथे लवकरच आंदोलनाची रुपरेषा अंतिम केली जाणार आहे. या बैठकीत उदगीर शहरातील विविध विषयावर देखील चर्चा करण्यात आली तसेच डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज व कंबळीबाबांचे स्मरण करण्यात आले. उदगीर तालुक्‍यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते महासंघात प्रवेश करत असल्याचे प्रांताध्यक्ष प्रा.बिरादार यांनी सांगितले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार