MB NEWS:जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं', पंतप्रधानांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे*

'जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं', पंतप्रधानांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे                            -----------------------------------     



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ६ वाजता देशातील नागरिकांना संबोधित केलं. कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सातव्यांदा जनतेला संबोधित केलं आहे. कोरोना व्हायरस अजून गेला नाही. त्यामुळे बाजारपेठांमध्ये गर्दी करणं योग्य नाही, असं सांगत पंतप्रधानांनी आज भाषणाला सुरूवात केली.                               

*◼️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे*                                            -----------------------------------          ⭕लॉकडाऊन गेलं असेल तरी कोरोना व्हायरस गेलेला नाही. बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. 

आपल्याला परिस्थिती सुधारायची आहे, बिघडवायची नाही.               -----------------------------------     

  ⭕आज देशात रिकव्हरी रेट चांगला आहे. भारतात प्रती 10 लाख लोकसंख्येत जवळपास साडे पाच हजार लोकांना कोरोना झाला आहे. अमेरिकेत हा आकडा २५ हजार आहे.

१० लाख लोकसंख्येत जवळपास मृत्यूदर हा ८३ आहे. तर अमेरिकेत हा आकडा ६०० च्या पार आहे.

आपल्याकडे १२ हजार काॅरन्टाईन सेंटर्स आहेत.

२ हजार लॅब टेस्टिंग लॅब आहेत.    

   -----------------------------------      

 ⭕टेस्टची वाढणारी संख्या ही ताकद आहे

बेफिकीर होण्याची ही वेळ नाही, काळजी घेण्याची गरज आहे.     *पकी खेती देखिके, गरब किया किसान।अजहूं झोला बहुत है, घर आवै तब जान।* याचा अर्थ आपण बेफिकीर राहू नये. कोरोना संपल्याचे समजू नये. आपल्याला लस येईपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यायची आहे. कोरोनाची लस बाजारात आल्यावर ती प्रत्येकाकडे पोहोचवण्याचा विचार केला जाईल. त्यामुळे आपली काळजी घ्या. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार