MB NEWS:पैशासाठी आईला जाळून मारण्याचा प्रयत्न केज तालुक्यातील घटना; दोघांना अटक

 


पैशासाठी आईला जाळून मारण्याचा प्रयत्न

केज तालुक्यातील घटना; दोघांना अटक


केज,  ः वडीलांपश्‍चात आईच्या नावावर असलेल्या पैशावर डोळा ठेवत तिला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना केज तालुक्यात शनिवारी रात्री घडली. गावकर्‍यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. या महिलेच्या दोन्ही मुलांना अटक करण्यात आली आहे. त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

केज तालुक्यातील चिंचोली कानडी माळी येथील इंदुबाई कुचेकर यांची पती लालासाहेब कुचेकर हे पोलिस सेवेत होते. काही वर्षांपूर्वी ते बेपत्ता झाले होते, त्यामुळे त्यांना मयत घोषित करण्यात आले. लालासाहेब कुचेकर यांच्या पश्चात वारस म्हणून त्यांची पत्नी इंदुबाई कुचेकर यांन भविष्य निर्वाह निधी व त्यांच्या खात्यावर जमा असलेली रक्कम 9 लाख रुपये मिळाले होते. त्यातील बरीचशी रक्कम तिने आपली दोन्ही मुले संतोष कुचेकर व नितीन कुचेकर या मुलांना दिली. त्या नंतरही खात्यावर असलेले 4 लाख 84 हजार रुपये आम्हाला दे म्हणून त्यांचा सारखा तगादा होता. त्यातून संतोष व सचिन हे दोन्ही मुले आईशी सतत भांडण करीत होते. दि.3 ऑक्टोबर रोजी संतोष कुचेकर व सचिन कुचेकर या दोघांनी आपली जन्मदाती आई इंदुबाई कुचेकर हिस आम्हाला तुझ्या नावावर असलेले भविष्य निर्वाह निधीतील पैसे का देत नाहीस म्हणून भांडण केले. यावेळी शिवाजी रघुनाथ राऊत यांच्या  दुकानासमोर इंदुबाई हिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी उपस्थित असणार्‍या गावकर्‍यांमुळे अनर्थ टळला. या प्रकरणी इंदुबाई कुचेकर यांच्या तक्रारीवरुन संतोष कुचेकर आणि सचिन कुचेकर या दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेचे गांभीर्य पाहता प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दि. 6 ऑक्टोबर पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार