MB NEWS:अन् फडणवीसांचा ताफा अपसुक वळला......!

 अन् फडणवीसांचा ताफा अपसुक वळला......!



विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोपीनाथ गडावर नतमस्तक!

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पहाणी करण्यासाठी सध्या दौऱ्यात असलेले माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अंबाजोगाईहून परभणी कडे रवाना होतांना दौर्यात नसलेल्या मार्गाकडे त्यांचा ताफा अपसुक वळला. या धावत्या दौऱ्यात ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन आशिर्वाद घेतला.



          अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असून याची पाहणी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधन्यासाठी विधान सभेचे विरोधीपक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या मराठवाड्यातील दौऱ्यात आहेत.आज सायंकाळी अंबाजोगाई येथून परभणी कडे मार्गस्थ होताना ते आवर्जून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ गोपीनाथ गडावर गेले.याठिकाणी गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन त्यांनी आशिर्वाद घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !