MB NEWS:मतदार यादी प्रसिद्ध, मतदारांनी नाव यादीमध्ये असल्याची खात्री करण्याचे आवाहन*

 *मतदार यादी प्रसिद्ध, मतदारांनी नाव यादीमध्ये असल्याची खात्री करण्याचे आवाहन*




बीड,  दि. 4::-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2020 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुननिरीक्षण कार्यक्रम जिल्हा निवडणूक अधिकारी बीड यांच्यावतीने घेण्यात आला. त्यामध्ये दिनांक 13 मार्च 2020 पासून नवीन नाव नोंदणी, मतदारांचे नावात बदल, नांवात दुरुस्ती, नाव वगळणे, तपशिलात दुरुस्ती या बाबत कार्यक्रम राबविण्यात आला आहे. 


 बीड जिल्ह्यातील 228- गेवराई, 229 -माजलगाव ,230 -बीड, 231 -आष्टी, 232 -केज, आणि 233- परळी या सहा विधान मतदार संघाची अंतिम मतदार यादी दिनांक 25 सप्टेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय व सर्व तहसील कार्यालय यांचे स्तरावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सर्व मतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीमध्ये असल्याबाबत व त्याचा तपशील याची खात्री करावी असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी, बीड यांच्या वतीने प्रवीण धरमकर उप जिल्हा निवडणूक अधिकारी, बीड यांनी केलेले आहे.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार