इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:पीकाच्या नुकसानीचे भरपाई द्या अन्यथा तीव्र करू-साईराजे देशमुख

 पीकाच्या नुकसानीचे भरपाई द्या अन्यथा तीव्र करू-साईराजे देशमुख  



परळी(प्रतिनिधी):-ऑक्टोबरध्ये झालेला अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पंचनाम्याच्या फेऱ्यात न अडकविता शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५०,०००रूपय मदत करावी अन्यथा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष मा.नानासाहेब जावळे पाटील , याचा नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा अ.भा.छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष साईराजे देशमुख यांनी दिला.

      तालुकाध्यक्ष साईराजे देशमुख यांनी दिलेल्या पत्राद्वारे म्हटले होते की चालू खरीप हंगामाध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर कापूस,तुर,सोयाबीन, बाजरी,आदी पीके चांगली आली होती. परंतु ऑक्टोबर चा परतीच्या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला गेला.कापसाच्या वाती झाल्या.सोयाबीन कोम फुटले, काढून ठेवलेल्या बाजरीचे भिजल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.अशा परिस्थिती मध्ये सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे.मंत्र्यांनी मंत्रालयात बसून चौकशी करण्यापेक्षा शेतकऱ्यांचा बादावर जाऊन त्यांचे हाल विचारावेत आणि तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,०००हजार रूपये मदत देण्यात यावी अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना तीव्र प्रकारे आदोलन करूल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!