MB NEWS: माझा व्यवसाय माझा हक्क' नोंदणी शिबिराची अंतिम तारीख २५ ऑक्टोबर;लाभ घ्यावा-अनंत इंगळे*

 'माझा व्यवसाय माझा हक्क' नोंदणी शिबिराची अंतिम तारीख  २५ ऑक्टोबर;लाभ घ्यावा-अनंत इंगळे

  


 परळी वैजनाथ, प्रतिनिधी..      

     मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बिझनेस आॅन व्हील संबंधित उपक्रम नोंदणी शिबिराचा शुभारंभ  राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते  करण्यात आलेला आहे. रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी  'माझा व्यवसाय माझा हक्क' शिबिर उपयुक्त ठरणार आहे.  नोंदणी साठी अंतिम तारीख २५ आॅक्टोबर आहे.यामध्ये अधिकाधिक बेरोजगारांनी नोंदणी करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी केले आहे.

ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत   लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे नोंदणी शिबिर सुरू आहे. बेरोजगारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने 'माझा व्यवसाय माझा हक्क' शिबिर घेण्यात येत आहे.कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे या दृष्टिकोनातून आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही योजना राबविण्यात येत आहे.परळी मतदार संघातील बेरोजगारांसाठी या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा असा प्रयत्न आहे.  या योजनेअंतर्गत विविध व्यवसायांसाठी वाहन,कर्ज उपलब्धी, सबसिडी, आवश्यक वाहने, साधनसामग्रीची व्यवस्था आदींबाबत सबसिडी बरोबरच कर्ज व आर्थिक हातभार लावण्यात येणार आहे. परळी मतदारसंघातील बेरोजगारांसाठी व स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी उपलब्धी  आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी शिबिरात आपला व्यवसाय नोंदवावा. अधिकाधिक बेरोजगारांनी नोंदणी करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !