MB NEWS:गॅस सिलिंडरच्या किमती झाल्या कमी : अनुदान बंद

 🛑गॅस सिलिंडरच्या किमती झाल्या कमी : अनुदान बंद       --------------------------  



    मुंबई: गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. सध्या सिलिंडरची किंमत ५९७ रुपये आहे. या किमतीच्यावर दर गेले तरच ग्राहकांना अनुदान दिले जाते; मात्र किंमत कमी झाल्यामुळे चार महिन्यांपासून अनुदान बंद केले आहे. त्यामुळे हे अनुदान बंद का झाले यावरून ग्राहक संभ्रमात आहेत.देशात गॅस ग्राहकांना कमीत कमी किमतीत गॅस मिळाला पाहिजे. गॅसचा मूलभूत (बेसिक) दरही कमी झाला पाहिजे, यासाठी आंदोलने होत आहे. गॅसच्या मूलभूत दरापेक्षा जास्त किंमत झाल्यास सरकार तेवढ्याच किमतीचे अनुदान देते. एप्रिलपासून गॅसच्या मूलभूत (बेसिक) दरात वाढ झालेली नाही. सध्या प्रति सिलिंडर ५९७ रुपये मूळ किंमत आहे. या किमतीच्या वर म्हणजेच प्रति सिलिंडर ७०० रुपये दर झाल्यास सरकारकडून ५९७ रुपयांच्या वरती होणारी रक्कम म्हणजे १०३ रुपये ग्राहकांच्या बॅंक खात्यावर अनुदान म्हणून जमा केले जाते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !