MB NEWS:आधार नोंदणी व अपडेट;जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतली दखल

 

आधार नोंदणी व अपडेट;जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतली दखल !

आधार नोंदणी व अपडेटसाठी टोकनची गरज नाही ; नागरिकांनी आॅनलाईन आॅपाईंटमेंट घेऊन वेळेवर जावे -जिल्हाधिकारी


बीड.......
आधार नोंदणी व अपडेटसाठी टोकन घ्यायला परळी पंचायत समितीत सकाळी ७ वा.पासुन रांगा लागल्या.परळीत आणखी आधार केंद्र सुरु करण्याची नागरिकांची मागणी आहे.याबाबत MB News ने लक्षवेधी बातमी प्रसिद्ध केली.काही वेळातच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याची दखल घेत आधार नोंदणी व अपडेटसाठी टोकनची गरज नाही ; नागरिकांनी आॅनलाईन आॅपाईंटमेंट घेऊन वेळेवर जावे व गर्दी टाळावी असे आवाहन केले आहे.
          आधार नोंदणीसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांनी आधार अपॉईटमेंट पोर्टलची स्थापणा केली आहे.ऑनलाईन पध्दतीने अपॉईन्टमेंटसाठी
https://ask.uidai.gov.in किंवा https://appointments.uidai.gov.in या लिंकला भेट द्यावी. नागरिक आपल्या भागातील आधार केंद्र शोधून ऑनलाईन अपाँईटमेंट बुक करुन आधार केंद्रावर वेळेवर पोहचून गर्दी टाळू शकतो.जेणेकरुन कोविड-19 चा प्रसार थांबवणे शक्य होईल. याबरोबरच आधार केंद्रावर नागरिकांनी गर्दी न करता ऑनलाईन बुकिंगचा जास्तीत जास्त वापर करावा.
   
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्या कार्यालयीन परिपत्रकानूसार आधार दर पुढील प्रमाणे आहेत.नवीन यशस्वी आधार नोंदणी - निशुल्क (मोफत), 5 ते 15 वयोगटातील अनिवार्य असलेले बायोमेट्रिक - निशुल्क (मोफत), आधार दुरुस्ती पूर्ण बायोमेट्रिक सह डेमोग्राफिक अपडेट (डोळे IRIS, हाताचे बोटे,Finger, फोटो ई.)- रु.100/- (जीएसटी सह), आधार दुरुस्ती केवळ डेमोग्राफिक (नाव,जन्म, दिनांक, जेन्डर, पत्ता, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक दुरुस्ती )- रु. 50/- (जीएसटी सह), ई-आधार डाउनलोड आणि कलर प्रिंट ए-4 पेज- रु. 30/- (जीएसटी सह).

सदर आधार नोंदणी ही आधार चालकाद्वारे ठराविक शासकीय कार्यालयात उपलब्ध असून नागरिकांनी निश्चित केलेले शुल्क आधार केंद्रावर अदा करुन या सेवेचा लाभ घ्यावा. तसेच सदरील केंद्रावर जास्तीच्या शुल्काची मागणी केल्यास नागरिकांनी केंद्रचालकाची तक्रार टोलफ्री क्रमांक- 1947 यावर करावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार