MB NEWS:यशोगाथा:एस.एस.कराड बनले पीएसआय*

 _परळी तालुक्यातील आणखी एका भुमीपुत्राची पोलीस दलात भरारी_



*यशोगाथा:एस.एस.कराड बनले पीएसआय*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

     येथील एस.एस.कराड यांची पीएसआय म्हणून निवड झाली आहे.खात्याअंतर्गत परिक्षेत ते सन २०१३ मध्ये उत्तीर्ण झाले होते.त्यांची आता पदस्थापना  पोलीस उपनिरीक्षक म्हणून झाली आहे.परळी पोलीस दलात यापूर्वी त्यांनी सेवा बजावलेली आहे.विशेष म्हणजे ते परळी तालुक्याचेच भुमीपुत्र आहेत.

    परळी तालुक्याचे भुमीपुत्र असलेले सुभाष संभाजीराव कराड हे तपोवन येथील मुळ रहिवासी आहेत.१९८६ पासुन ते पोलीस दलात कार्यरत आहेत.सेवेतील विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडलेल्या आहेत.कर्तव्यदक्ष, शांत, मितभाषी, सुस्वभावी व सरळ सरळ कार्यपद्धती ही त्यांची ओळख आहे.पोलीस दलात काम करत असताना कर्तव्यपुर्ती करून त्यांनी खात्याअंतर्गत परिक्षा दिली.यामध्ये सन २०१३ मध्ये ते महाराष्ट्रात गुणवत्तेने उत्तिर्ण झालेले आहेत. महाराष्ट्र स्तरावर १०६१ पैकी त्यांचा ५७ वा क्रमांक आहे. पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची पदस्थापना होणार आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

    या नविन जबाबदारी ने पोलीस दलात काम करताना प्रामाणिकपणे व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक सेवा बजावू अशी प्रतिक्रिया एस.एस. कराड यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार