MB NEWS:दररोज एका वाढत्या सुवर्ण अलंकाराने श्री योगेश्वरी देवीची होतेय अलंकार पूजा

 दररोज एका वाढत्या सुवर्ण अलंकाराने श्री योगेश्वरी देवीची होतेय अलंकार पूजा



 

अंबाजोगाई -  नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने श्री योगेश्वरी देवीची विधीवत तीन वेळा महाआरती होते. दररोज एका वाढत्या सुवर्ण अलंकाराने अलंकार पूजा सुरू आहे. भाविकांना दर्शन नसले तरी मंदिरात सर्व विधीवत उपक्रम नित्य स्वरूपात सुरू आहेत. 

                महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव सुरू आहे. या नवरात्र महोत्सवात दररोज पहाटे पाच वाजता महाअभिषेक व महापूजा त्यानंतर काकडा आरती. दुपारी १२ वाजता माध्यान्ह महापूजा व दररोज रात्री शेजआरती नित्याने  सुरू आहे. दुपारी १२ वाजता माध्यान्ह महापुजेनंतर नैवद्य महाआरती होते. यानंतर श्री योगेश्वरी देवीला दररोज एक नवा दागिना घालून अलंकार पूजा केली जाते. घटस्थापनेच्या प्रारंभीच महापूजेनंतर श्री योगेश्वरी देवीला ठेवणीतले दागिने व सुवर्ण अलंकार विधीवत चढवले जातात. घटस्थापनेच्या दिवशी सुवर्ण कुंकू, चंद्रकोर, बिंदिया, सुवर्ण मुख, कर्णफुले, सरपाळ्या, डोळे, सोन्याची फुले, हे दागिने घातले जातात.तर महापूजेनंतर नऊ दिवसाच्या नऊ माळेप्रमाणे दररोज एक वाढता सुवर्ण अलंकार देवीला घातला जातो. यात दशावतारी माळ, गजरामणी माळ, बोरमाळ, चप्पल हार, सोन्याच्या पुतळ्यांची माळ, चंद्रहार असे सर्व अलंकार दसºयापर्यंत वाढीव पद्धतीने घातले जातात. अशी माहिती योगेश्वरी देवीचे मुख्य पुजारी सारंग पुजारी यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही पारंपारिक पद्धत आजही जोपासली जाते. 


*पुजाऱ्यांची  पाचवी पिढी देवीच्या सेवेत*

अंबाजोगाई येथे श्री योगेश्वरी देवीच्या दैनंदिन पुजेसाठी व महापुजेसाठीचा बहुमान अंबाजोगाईच्या पुजारी मंडळाला जातो. ही प्रथा राजवाडे यांच्याकडून मिळालेला बहुमान आहे. प्रारंभी योगिराज पुजारी यांच्या माध्यमातून सुरू झालेली ही सेवा किसनराव पुजारी, हरिपंत पुजारी, अरूण पुजारी, मुकुंद पुजारी यांच्यामार्फत आज या पुजेचा वारसा सारंग पुजारी, गिरीश पुजारी, कृष्णा, पृथ्वीराज, योगिराज हे समर्थपणे जोपासत आहेत. 

-----

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार