MB NEWS:वैद्यनाथ साखर कारखान्याच्या गळीताची तयारी: पूर्ण क्षमतेने कारखाना चालविण्यासाठी सज्जता

 वैद्यनाथ साखर कारखान्याच्या गळीताची तयारी: पूर्ण क्षमतेने कारखाना चालविण्यासाठी सज्जता



ऊसतोडणी वाहतूक कराराचा  शुभारंभ; पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना पुर्ण क्षमतेने चालवणार 


परळी वैजनाथ दि. १७... 

       तालुक्यातील मौजे पांगरी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम २०२१ च्या ऊसतोडणी आणि वाहतूक कराराचा शुभारंभ आज शनिवारी कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव यांच्या हस्ते आणि माजी आमदार तथा कारखान्याचे संचालक आर. टी. देशमुख यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. वैद्यनाथ कारखाना सुरू होणार असल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

       वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना माजी मंत्री तथा कारखान्याच्या चेअरमन पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी पुर्ण क्षमतेने गाळप करणार आहे. कारखान्याची आंतर्गत कामे युद्धपातळीवर सुरू झाली आहेत. लवकरात लवकर कारखाना गाळपासाठी सज्ज करण्यासाठी कर्मचारी सरसावले आहेत. दरम्यान आज शनिवारी दुपारी ३ वाजता ऊसतोडणी आणि वाहतूक कराराचा शुभारंभ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुर्गामाता, प्रभू वैद्यनाथ आणि कारखान्याचे संस्थापक लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

    यावेळी माजी आमदार तथा कारखान्याचे संचालक आर. टी. देशमुख, संचालक सर्वश्री शिवाजी गुट्टे, पांडुरंगराव फड, ज्ञानोबा मुंडे, आश्रोबा काळे, त्रिंबकराव तांबडे, भाऊसाहेब घोडके, किशनराव शिनगारे, व्यंकटराव कराड, केशवराव माळी, गणपतराव बनसोडे, कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दिक्षीतुलू, भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिश मुंडे, सुरेश माने, वृक्षराज निर्मळ, देवराव कोपनर,  बाळासाहेब शिंदे, बालासाहेब मुंडे, वैजनाथ सातभाई,अनिरुद्ध आंबुरे, बाबू केकान, भास्कर शेप, अब्दुल सलाम सौदागर, माऊली बीडगर, चिफ केमिस्ट रमेश जायभाये, ऊस पुरवठा अधिकारी तुकाराम गडदे, यांच्यासह कार्यक्षेत्रातील आणि धारूर, वडवणी, माजलगाव, पाथरी या परिसरातील ऊसतोडणी वाहतूक ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 


ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

       दरम्यान वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना सुरू होत असल्याने भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार