MB NEWS:वाण धरणाचे पाणी शेतीला मिळावे यासाठी किसान सभेचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन*

 वाण धरणाचे पाणी शेतीला मिळावे यासाठी किसान सभेचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन



*परळी वै. प्रतिनिधी*

     नागापुर येथील वाण धरण परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे यासाठी महाराष्ट्र किसान सभेच्या वतीने पालकमंत्री ना. धनंजय मुंडे व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन देण्यात आले. 

शनिवार दि. 10 रोजी नागापुर येथील वाण धरणावर पालकमंत्री ना. धनंजय मुंडे व जिल्हाधिकारी राहुल रेखावार आले होते. त्यावेळी महाराष्ट्रराज्य किसान सभेच्या वतीने वाण धरण लाभ क्षेत्रातील शेतीला पाणी मिळावे यासह माजलगाव धरणाचे पाणी वाण धरणात सोडण्यात यावे. वाण धरणाचे पाणी रब्बी पिकासाठी तात्काळ मिळाले पाहिजे. वाण धरणावरील उतरून नेलेले ट्रांसफार्मर तात्काळ बसवले पाहिजे. 2015 पासून बंद असलेल्या मोटारीचे बिल माफ झाले पाहिजे. तीन महिन्यापासून नादुरुस्त असलेला ३३ के.व्ही.मधील ट्रांसफार्मर तात्काळ भरला पाहिजे. या मागण्यांचे निवेदन पालकमंत्री मुंडे व जिल्हाधिकारी रेखावार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी किसान सभेचे जिल्हा सचिव काॅ. मुरलीधर नागरगोजे, काॅ. अशोक नागरगोजे, काॅ. मनोज स्वामी, काॅ. विष्णु नागरगोजे, काॅ. धनंजय वाव्हळे, संजय नवघरे, विजय घुगे, रावन नागरगोजे, बालासाहेब गुट्टे, अनंत गुट्टे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार