परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
भगवान भक्तीगडावरचा दसरा मेळावा यंदा ऑनलाईन -पंकजा मुंडे यांनी दिली माहिती
बीड, ः स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी सुरु केलेली भक्ती आणि शक्तीची परंपरा अखंडीत राहणार आहे. परंतु यावर्षी कोरोनाचे संकट पाहता दसर्यादिवशी ऑनलाईन संवाद साधणार असल्याची घोषणा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केली. दसर्यादिवशी सावरगाव येथील भगवान भक्तीगडावर दर्शन घेवून पंकजा मुंडे या मार्गदर्शन करणार आहेत.
सावरगाव (ता.पाटोदा) येथील भगवान भक्तीगडावर होणार्या मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागलेले असते. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पश्चात पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मेळावा होतो. या मेळाव्याने गर्दीचे उच्चांक प्रस्थापित केलेले आहेत. परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा मेळावा कसा होणार, किती लोक येणार, प्रशासन परवानगी देणार का, असे प्रश्न उपस्थित होत असतांना भाजप नेते पंकजा मुंडे यांनी याबाबत घोषणा केली आहे. गोपीनाथराव मुंडे यांनी प्रत्येक दसर्याला भक्ती आणि शक्तीची परंपरा सुरु केली होती. ती परंपरा मी पुढे चालवत आहे. यातील माझी शक्ती म्हणजे तुम्ही सर्वजण आहात. ही शक्ती क्षीण होणार नाही, याची काळजी मी घेणार आहे. गत दोन दिवस मी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी गेले. त्यावेळीही मोठी गर्दी जमा होत होती. भगवान भक्तीगडावर तर यापेक्षा जास्त गर्दी होते. मग माझ्या लोकांचे आरोग्य मी संकटात टाकू शकत नाही. यामुळेच यावर्षीचा दसरा सर्वांनी आपआपल्या गावीच साजरा करायचा आहे. मी भगवान भक्तीगडावर जाणार आहे, तेथे दर्शन घेणार आहे आणि ऑनलाईन मार्गदर्शनही करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. दसर्यादिवशी गावोगावी घ्यायचे कार्यक्रम आणि दौर्याविषयीची अधिक माहिती लवकरच दिली जाईल असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा