MB NEWS: वडगाव दा. धरणे आंदोलन.......

 मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा; वेळप्रसंगी आंदोलन करू-राजेश गित्ते



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : सकळ मराठा  समाजाच्यावतीने दादाहारी वडगाव येथे मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी साखळी धरणे आंदोलन सुरू झाले असून या आंदोलनास भाजपाचे जेष्ठ नेते राजेश गित्ते यांनी आंदोलन कत्यार्ंची भेट देवून पाठिंबा दशर्विला असून वेळप्रसंगी आंदोलन करू अशी ग्वाही राजेश गित्ते यांनी दिली.

परळी तालुक्यातील मौजे दादाहारी वडगाव येथे दि.०७ ऑक्टोबर पासून ग्रामपंचायत कार्यालय समोर सकळ मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षण मिळावे. या मागणीसाठी साखळी धरणे आंदोलन सुरू केले आहे.

दुसर्‍या दिवशी दि.०८ ऑक्टोबर रोजी आंदोलन कर्त्याची भाजप जेष्ठ नेते राजेश गित्ते यांनी भेट घेवून त्यांच्या मागणी सदर्भात चर्चा करण्यात आली.

या आंदोलनास माझा पाठिंबा असून मराठा समाजाला आरक्षण मिळणे काळाची गरज आहे. वेळ प्रसंगी आंदोलन करून मराठा समाजाला न्याय मिळवून देवू असे ही राजेश गित्ते यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी बीडच्या खा.प्रितमताई मुंडे यांनी लोकसभेत आवाज  उटविला होता. 

यावेळी आंदोलन कर्ते शिवाजीराव शिंदे, भास्करराव शिंदे, रामराव शिंदे, धम्मराज शिंदे, यांच्यासह आदींची भेट घेवून पाठिंबाचे पत्र दिले.

यावेळी माजी प.स.सदस्य मारोतीराव फड, सरपंच अरूणराव दहिफळे, माजी सरपंच माणिकराव कडबाने, सरपंच धुवाजी साबळे, सुंदरराव मुंडे, अनिल गुट्टे, यांच्यासह आदी उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार