MB NEWS:एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्या मुळे ओबीसी व अठरापगड समाजातील मुलांवर अन्याय ―प्रा.टी. पी.मुंडे*

 


एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्या मुळे ओबीसी व अठरापगड समाजातील मुलांवर अन्याय ―प्रा.टी. पी.मुंडे

राज्य सरकारच्या निर्णयाचा प्रा.टी. पी. मुंडे यांच्याकडून जाहीर निषेध.


परळी वैजनाथ,प्रतिनिधी...

11 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा सकल मराठा संघटनांनी आंदोलन केल्यामुळे राज्य सरकारने पुढे ढकलली त्यामुळे दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या ओबीसी व अठरापगड समाजातील  जातीच्या विद्यार्थ्यांवर या निर्णयामुळे अन्याय झाला असून या निर्णयाचा महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा.टी.पी. मुंडे सर यांनी जाहीर निषेध केला आहे.

कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजातील संघटनांनी आंदोलनाचा इशारा सरकारला दिला तेव्हा सरकारने या आंदोलनाला प्रतिसाद देत एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला परंतु त्यामुळे ओबीसी समाजातील व अठरापगड जातीच्या विद्यार्थ्यांनी दिवस-रात्र अभ्यासासाठी केलेली मेहनत वाया गेली याचा परिणाम एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाला आहे . विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पोटाला चिमटा घेऊन त्यांना पुणे औरंगाबाद यासारख्या शहरांमध्ये शिकवणीसाठी अभ्यास करण्यासाठी खर्च केला परंतु तोसुद्धा आर्थिक भुर्दंड ओबीसी समाजातील  पालकांना सहन करावा लागत आहे. 

ओबीसीना धक्का न  लावता मराठा समाजाला आरक्षण  देण्यात यावे  असे आम्ही पूर्वीही आम्ही म्हटले आहे परंतु काही मराठा समाजातील नेते मंडळी व संघटना ही ओबीसी समाजात समावेशाची व आरक्षणाची मागणी करत आहेत हे  चुकीचे आहे एमपीएससी ची परीक्षा देणारे विद्यार्थी हे कोरोना काळातील शासनाने दिलेल्या सर्व  नियमांचे पालन करून परीक्षा देणार होते तसेच कोरोनाचे  नियम न पाळता मराठा समाजातील नेत्यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले त्यामध्ये कसलेही कोरोना चे नियम पाळले गेले नाहीत. कोरोना हे कारण दाखवून सरकार व मराठा समाजातील काही संघटनांनी हे षड्यंत्र रचले आहे ओबीसी संघटना त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत मात्र ओबीसी समाजात यामुळे भीती पसरवण्याचे षड्यंत्र केले जात आहे.


     वंचित बहुजन आघाडीचे नेते मा बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी व अठरापगड जातीतील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडली त्यांनी या सरकारच्या निर्णयाचा कडाडून जाहीर निषेध केला मात्र मा बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले हे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र ओबीसी समाजाचे नेते प्रा.टी. पी. मुंडे सर यांनी केली तसेच त्यांच्यावर गुन्हे  नोंदवल्याचा जाहीर निषेधही केला.

छत्रपती संभाजी राजे यांनी तुळजापूर येथे आंदोलनाला भेट दिली असता तलवारीची भाषा केली मात्र पुरोगामी महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू-फुले-आंबेडकर या पुरोगामी विचारांना मानणारा आहे आणि राजश्री शाहू महाराजांच्या गादीवर बसणारे छत्रपती संभाजी राजे यांना तलवारीची भाषा शोभत नाही ही तलवारीची भाषा कोणासाठी आहे याचे उत्तर राजेंनी दिले पाहिजे. या कृतीचा ओबीसी नेते प्रा. टी.पी. मुंडे सर यांनी जाहीर निषेध केला.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी अशा प्रकारे कोणाच्या दबावाला बळी पडून निर्णय घेऊ नयेत अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशाराही ओबीसी नेते प्रा.टी. पी. मुंडे सर यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !