MB NEWS:*परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे;आता आणखी एक बीडला जोडणारा रेल्वेमार्ग सुरू होणार* *सोलापूर-तुळजापूर-बीड-जळगाव रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण अखेर पूर्ण

 *परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे;आता आणखी एक बीडला जोडणारा रेल्वेमार्ग सुरू होणार* 



*सोलापूर-तुळजापूर-बीड-जळगाव रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण अखेर पूर्ण*                                -----------------------------------    

*  सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील मराठवाड्याला जोडणाºया महत्त्वपूर्ण अशा सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद-बीड-जळगाव रेल्वेमार्ग लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे़ त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत़ सध्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, भूसंपादन (जमीन संपादित) करण्याचे काम सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली़ याबाबत सोलापूरचे खा़ जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.   मध्य रेल्वे विभागात असलेल्या सोलापूर विभागातील खासदारांची रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्यासोबत आॅनलाइन बैठक झाली़ या बैठकीस मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, खा़ जयसिद्धेश्वर महास्वामी, खा़ रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खा़ ओमप्रकाश निंबाळकर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता, उपव्यवस्थापक व्ही़ के़ नागर, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप हिरडे आदी खासदार उपस्थित होते.सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद -बीड-जळगाव रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाने मार्च २०१९ मध्ये मंजुरी दिली होती, त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेतले होते़ सोलापूरपासून शेवटच्या स्थानकापर्यंतचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे़ नकाशे, रेखांकनाचे काम प्रगतिपथावर आहे. भूसंपादनासाठीची सर्व कार्यवाही केली जात आहे. भूसंपादन, पूल व इतर कार्यासाठी इंजिनिअरिंग कन्सल्टंटची नेमणूक करण्याचे काम सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्यासोबत खासदारांच्या झालेल्या आॅनलाइन बैठकीत सर्वच खासदारांनी नव्या गाड्या सुरू करण्यासोबत आहे त्या गाड्यांना जास्तीत जास्त रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यासंदर्भात चर्चा केली़ रेल्वे मंत्रालयाशी समन्वय साधून जास्तीत जास्त मागण्या, अडचणी, कामे पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही मत खा़ जयसिद्धेश्वर महास्वामी व खा़ रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले़ 

*खा.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांना यश*



 सोलापूर-तुळजापूर-बीड-जळगाव रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण



मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील मराठवाड्याला जोडणाऱ्या महत्वपूर्ण सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद-बीड-जळगाव या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती.यासंदर्भात बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी सतत पाठपुरावा केला होता.अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून सदरील रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे.


हा रेल्वे मार्ग मराठवाडा व प्रामुख्याने बीड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्यामुळे खा.प्रितमताई मुंडे यांनी पाठपुरावा करताना सर्वेक्षणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा व वेळेत सर्वेक्षण पूर्ण व्हावे यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालय व संबंधित विभागांकडे पत्र व्यवहार केला होता.त्यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार