MB NEWS:दुर्गाष्टमी पर्यंत तोडगा न निघाल्यास ऊसतोड कामगार दुर्गेचा अवतार घेतल्याशिवाय राहणार नाहीत- पंकजा मुंडे यांचा सुचक इशारा

 दुर्गाष्टमी पर्यंत तोडगा न निघाल्यास ऊसतोड कामगार दुर्गेचा अवतार घेतल्याशिवाय राहणार नाहीत- पंकजा मुंडे यांचा सुचक इशारा

---------------------------



नांदेड,प्रतिनिधी...

    अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पहाणी व शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी बांधावर पहाणी दौरा करत असलेल्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना ऊसतोड मजुर संपाबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता दुर्गाष्टमीपर्यंतची डेटलाईनच त्यांनी दिली आहे.

ऊसतोड कामगारांच्या संपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, हा प्रश्न सप्टेंबर मध्येच मिटला असता परंतू यात फाटे फोडण्याचे काम झाले. हा संप मी सुरू केला आहे. कामगारांच्या दरवाढी बाबत मी वारंवार साखर कारखाना संघाकडे आग्रह धरला आहे. संबंधित नेत्यांनाही बोलले आहे. लवादा सोबत चर्चा करून हा प्रश्न मिटण्याची लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांपासूनची परंपरा आहे त्यामुळे दुर्गाष्टमी पर्यंत यावर तोडगा नाही निघाला तर ऊसतोड कामगार दुर्गेचा अवतार घेतल्याशिवाय राहणार नाहीत असे त्या म्हणाल्या.यावेळी आ. राजेश पवार, आ. तुषार राठोड, देविदास राठोड व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार