MB NEWS:परळीत बाजार समिती परिसरात स्वयंचलीत निर्जंतुकीकरण केंद्राचा शुभारंभ

 परळीत बाजार समिती परिसरात स्वयंचलीत निर्जंतुकीकरण केंद्राचा शुभारंभ



• मोंढ्यातील व्यापारी,शेतकरी, नागरिकांना उपयुक्त 


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-

         सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी परळीत राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने प्रयत्नशील आहे.त्याअनुषंगाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे लीगल सेलचे अध्यक्ष अँड. मनजीत सुगरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात स्वयंचलीत निर्जंतुकीकरण केंद्राचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. 

         देशासह संपूर्ण जगात सद्यस्थितीत कोरोना विषाणुसंसर्ग आजाराच्या जागतिक महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे देशात व राज्यात आपत्कालीन परिस्थती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात येणाऱ्या शेतकरी नागरिकांना व्यापारी यांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त असे स्वयंचलीत निर्जंतुकीकरण यंत्राचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष तथा रा.कॉ.चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी जेष्ठ नेते सुरेश अण्णा टाक,रा.कॉ युवक चे शहराध्यक्ष सय्यद सिराज, नगरसेवक जयप्रकाश लड्डा, बाजार समिती सचिव बलवीर रामदासी, विश्वनाथ गायकवाड,  मुक्तर भाई, देवराव कदम, गणेश मगर, सुनील तरटे, मुन्ना, रंजीत सुगरे आदी उपस्थीत होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार