MB NEWS:*ब्राह्मण समाज आर्थिक विकास महामंडळाची प्रक्रिया झालेली आहे- चंद्रकांत पाटील* *प्रलंबित मागण्यांसाठी समाजाच्या सोबत-खा.डॉ.प्रितमताई मुंडे*

 *ब्राह्मण समाज आर्थिक विकास महामंडळाची प्रक्रिया झालेली आहे- चंद्रकांत पाटील*


*प्रलंबित मागण्यांसाठी समाजाच्या सोबत-खा.डॉ.प्रितमताई मुंडे*



बीड-


ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळासह इतर मागण्यासाठी सकारात्मक विचार करून महामंडळ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती परंतु काही अडचणी निर्माण झाल्या या बाबत मी पाठपुरावा करणार असल्याचे माजी मंत्री तथा भाजपा चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी व भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडला शुक्रवारी प्रलंबित मागण्यांचे स्मरणपत्र स्वीकारताना सांगितले.


ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने जागो सरकार जागो आंदोलन सुरू आहे. राज्यातील सर्व पक्षीय आजी माजी मंत्री, खासदार, आमदार या सर्व लोकप्रतिनिधींना प्रलंबित मागण्यांचे सोमवार रोजी माजी मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांना बीड येथे समितीचे मुख्य समन्वयक प्रमोद पुसरेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,भगीरथ बियाणी, नितिन कुलकर्णी, विजयकुमार पालसिंगकर,योगेश जोशी,अक्षय भालेराव,भालचंद्र कुलकर्णी, यांनी भेट घेऊन स्मरणपत्र दिले. यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळासह इतर मागण्यासाठी सकारात्मक विचार करून महामंडळ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती परंतु काही अडचणी निर्माण झाल्या या मागण्यांसाठी अधिवेशनात पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तर खा.डॉ प्रितमताई मुंडे यांनी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मी समाजाच्या सोबत असल्याचे सांगितले.

  समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने जागो सरकार जागो आंदोलना अंतर्गत राज्यातील सर्व पक्षीय आजी माजी मंत्री, खासदार, आमदार या सर्व लोकप्रतिनिधींना प्रलंबित मागण्यांचे निवेदन देऊन स्मरण करून देण्यात येत असून शासन-प्रशासनाने तात्काळ ठोस पावले न उचलल्यास आंदोलनाचा तिसरा टप्पा आणखी तीव्र करणार असल्याचेही समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती च्या वतीने सांगण्यात आले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !