प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा

 श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा



सिरसाळा () :- येथील श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. 11 नोव्हेंबर रोजी मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना प्राचार्य कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी कलाम साहेब हे भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते. त्यांनी हिंदू मुस्लीम ऐक्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, भारतात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले, असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सोळंके यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या