MB NEWS: *किसान सभेच्या आंदोलनास यश;ट्रान्सफार्मर बसविण्याचे लेखी आश्वासन*

 *किसान सभेच्या आंदोलनास यश;ट्रान्सफार्मर बसविण्याचे लेखी आश्वासन*



परळी वै. प्रतिनिधी

दररोज चार याप्रमाणे वाण धरणावरील सर्व ट्रान्सफार्मर येत्या आठ दिवसात बसविण्याच्या लेखी आश्वासनाने किसान सभेच्सा बेमुत ठिय्या आंदोलनाला यश मिळाले आहे.

वाण धरणातील पाणी शेतकर्यांना मिळावे, प्रशासनाने उतरुण नेलेले विजेचे ट्रान्सफार्मर तात्काळ बसउन द्यावे, 2015 पासुन बंद असलेल्या मोटारीचे वीज बिल माफ करावे व जायकवाडीचे पाणी लिफ्टद्वारे वाण धरणात सोडावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने सोमवारी दि.९ रोजी नागापुर येथील वाण धरणावर सकाळी दहा वाजल्या पासुन ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आले होते. दुपारी एक वाजता विज वितरण चे परळी येथील अतिरीक्त कार्यकारी अभियंत्यानी धरणावर जाउन आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी विज वितरण च्या अधिकार्यांनी येत्या आठ दिवसात धरण परिसरातील उतरूण नेलेले ट्रान्सफार्मर बसउन देण्याचे लेखी आश्वासन दिले. आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ. मुरलीधर नागरगोजे यांनी केले. यामुळे धरण परिसरातील शेतकर्यांना शेतीसाठी वाण धरणातील पाण्याचा उपयोग करता येणार आहे. या आंदोलनात काॅ प्रभाकर नागरगोजे, भिमराव मुंडे, काॅ अशोक नागरगोजे, रावण नागरगोजे, काशीनाथ मुंडे, गंगाधर नागरगोजे, वसंत नागरगोजे, पानु डिघोळे, अगदी पाळवदे, गणेश सिद्राम नागरगोजे, गेना नागरगोजे, उत्तम मुंडे, बालासाहेब नागरगोजे, गणेश आत्माराम नागरगोजे, जगन्नाथ खलसे यांच्यासह धरण परिसरातील शेतकरी मोठया संख्येनी सहभागी झाले होते.



*धरणावर पहिल्यांदाच झाले आंदोलन*

वाण धरणाच्या पाण्यासाठी वाण धरणावर आंदोलन झाल्याने परिसरात आंदोलात शेतकरी सहभागी झाले होते. आत्ता पर्यंत प्रशासकिय कार्यालया समोर आंदोलन होत असे. किसान सभेनी मात्र प्रश्नाच्या ठिकाणी आंदोलन करुण प्रश्नाची सोडवणुक करुण घेतली आसल्याने शेतकर्यांमधुन समाधान व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार