परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS: पदवीधर मतदार संघावर भाजपचा झेंडा फडकवा-पंकजाताई मुंडे

 *मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवा - पंकजाताई मुंडे* 


*कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे केले आवाहन ; शिरीष बोराळकर यांच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उदघाटन* 



औरंगाबाद दि. १२ ------ मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा पूर्वीपासून भाजपचाच आहे, आता तो पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले.


   मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या सेव्हन हिल परिसरात सुरू करण्यात आलेल्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, निवडणूक प्रमुख संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डाॅ. भागवत कराड, आ. अतुल सावे, भाऊराव देशमुख, आ. मेघना बोर्डीकर, आ. रमेश कराड, आ. तानाजी मुटकळे, आ. राजेश पवार आदी यावेळी उपस्थित होते.


   पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या की, या कार्यक्रमाला मी येणारच होते, विमानाचे तिकीट उपलब्ध नव्हते पण कसेही करून आलेच, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. पक्ष जो उमेदवार देईल त्याला मेहनत घेऊन विजयी करायचे हे लोकेनेते मुंडे साहेबांचे संस्कार आमच्यावर आहेत, त्यामुळे बोराळकर यांना निवडून आणणे हे आमचे कर्तव्य आहे. हा मतदारसंघ पूर्वीपासून भाजपचा होता आणि आता पुन्हा एकदा या मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकावयाचा आहे, त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मानपान विसरून एकदिलाने व जोमाने कामाला लागायचे आहे. बोराळकर यांनी देखील एकही क्षण व्यर्थ न घालवता सर्वांशी समन्वय साधून विजयश्री खेचून आणावी. विजय आपलाच होणार आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांचेसह मराठवाडयातील सर्व जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



*उमेदवारी अर्ज दाखल*

--------------------------

पंकजाताई मुंडे यांचे सकाळी औरंगाबाद विमानतळावर आगमन होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठया उत्साहात त्यांचे स्वागत केले. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवार शिरीष बोराळकर यांनी रावसाहेब दानवे व पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी पदवीधरांच्या मेळाव्यास पंकजाताई मुंडे यांनी संबोधित केले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!