MB NEWS: *अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची मोठी हानी - धनंजय मुंडे*

 *अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची मोठी हानी - धनंजय मुंडे*



बीड (दि.२६) ---- : बीड येथील छत्रपती शाहू नागरी सहकारी बँकेचे संस्थापक, उद्योजक अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. 


स्व. अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत धनंजय मुंडे यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे, तसेच आपण पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचेही आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. 


बीड जिल्ह्यासह मराठवड्यातच नव्हे तर राज्यभर छत्रपती शाहू बँकेच्या शाखांचे जाळे अर्जुनराव जाहेर पाटील यांनी विणले. शाळा, आयटीआय आदी उभे करून एका सामान्य गरीब कुटुंबातील व्यक्तीने सहकारसह शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करून अनेकांसमोर एक आदर्श उदाहरण प्रस्थापित केले आहे, अशा व्यासंगी व्यक्तिमत्वाच्या निधनाने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !