MB NEWS:जवाहर एज्युकेशन सोसायटी संचलित वैद्यनाथ कॉलेज मधील १ कोटी ६ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी अध्यक्ष व इतरांना अटकपूर्व जामीन मंजूर

 जवाहर एज्युकेशन सोसायटी संचलित वैद्यनाथ कॉलेज मधील १ कोटी ६ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी अध्यक्ष व इतरांना अटकपूर्व जामीन मंजूर



अंबाजोगाई:- येथील तिसरे जिल्हा व सत्र न्यायालय कि. जा.अर्ज क्र.४९६/२०२० जुगलकिशोर व इतर वि. सरकार या प्रकरणाची सुनावणी होऊन जवाहर एज्युकेशन सोसायटी संचलित वैद्यनाथ कॉलेज मधील १ कोटी ६ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया व इतरांचा  अटकपूर्व जामीन अर्ज  मा.न्या.एम.बी.पटवारी मॅडम यांनी दि.२४/११/२०२० रोजी मंजूर केला.

सदरील प्रकरणाची   थोडक्यात हकीकत अशी की ,सन २०१८ पासून सदरील संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालय परळी वै. येथे विज्ञान विषयाच्या विद्यार्थ्यां व पालका कडून कॅपिटेशन फीस (देणगी) म्हणून ५००००/-₹ घेतली. सदर शिकवणी वर्ग २०१८ ऑगस्ट साली सुरू केले तत्पूर्वी सदर सोसायटीच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे अकॅडमी संस्थेला १०,००,०००/- दिले.

   तसेच शिकवणी साठी हॉल तयार करण्यासाठी ३,००,०००/- ₹ खर्च केले. तसेच ३०० विद्यार्थ्याना प्रवेश देऊन संस्थेच्या खात्यात २२,३५,८४१/- रुपये जमा करण्यात आले. विद्यार्थ्याकडून जमा केलेली लोकनेते गोपीनाथ मुंडे व जवाहर एज्युकेशन सोसायटी च्या दोन्ही खात्यात एकूण १,०६,००,०००/- ₹ जमा करण्यात आले.

जवाहर एज्युकेशन सोसायटी संचलित परळी वै. अध्यक्ष जुगलकिशोर रामपाल लोहिया,सचीव दत्तात्रय गणपतअप्पा इटके, कोषाध्यक्ष सुरेश बाबुराव अग्रवाल व प्राचार्य रामचंद्र किशनराव इप्पर यांनी विद्यार्थ्यांकडून अनधिकृत रक्कम वसूल केली अशा प्रकारची फिर्याद भास्कर पाटलोबा चाटे यांनी दिल्यावरून पोलीस स्टेशन परळी शहर येथे गु.र.नं.३०५/२०२० कलम ३ व ७ महाराष्ट्र शैक्षणिक संस्था(कॅपिटेशन फी घेण्यास प्रतिबंध) कायदा १९८७ व ४०९ भा. दं. वि.प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.सदरील प्रकरणातील जवाहर एज्युकेशन सोसायटी संचलित परळी वै. अध्यक्ष जुगलकिशोर रामपाल लोहिया,सचीव दत्तात्रय गणपतअप्पा इटके, कोषाध्यक्ष सुरेश बाबुराव अग्रवाल व प्राचार्य रामचंद्र किशनराव इप्पर यांनी मा.न्यायालयात अटकपूर्व जामीन साठी अर्ज दाखल केला होता.

     सदरील प्रकरणाची सुनावणी होऊन वरील सर्व आरोपींना १५,०००/- रुपयाच्या जमीन व व प्रत्येक सोमवारी पोलीस ठाण्यात हजेरी या अटीवर अटकपूर्व जामीन अर्ज  मा.न्या.एम.बी.पटवारी मॅडम यांनी दि.२४/११/२०२० रोजी मंजूर केला.सदरील प्रकरणात आरोपी तर्फे अँड.विक्रम खंदारे व अँड.प्रकाश मराठे यांनी काम पाहिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार