MB NEWS:*ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळीत पदवीधर भवन उभारण्यासाठी पुढाकार घेणार-बाजीराव भैय्या धर्माधिकारी* _सतिश चव्हाण यांच्या प्रचारार्थ किरण गित्ते अकॅडमी येथे पदविधारांशी साधला संवाद_

 *ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळीत पदवीधर भवन उभारण्यासाठी पुढाकार घेणार-बाजीराव भैय्या धर्माधिकारी*



  _सतिश चव्हाण यांच्या प्रचारार्थ किरण गित्ते अकॅडमी येथे पदविधारांशी साधला संवाद_


  परळी वैजनाथ, प्रतिनिधी ...

      ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळीत पदवीधर भवन उभारण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले. मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आ.सतिश चव्हाण यांच्या प्रचारार्थ किरण गित्ते अकॅडमी येथे पदविधारांशी  संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

         राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे  यांचे जिव्हाळ्याचे सहकारी महाविकास आघाडीचे उमेदवार आ.सतीश चव्हाण  यांच्या प्रचारार्थ पदवीधर युवकांशी संवाद साधताना बाजीराव धर्माधिकारी यांनी  ना.मुंडे  व आ.चव्हाण यांच्या कार्याचा आढावा विशद केला.नॅशनल लॉ स्कुल, वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील 70% व 30% प्रवेशाचे जाचक सूत्र रद्द करुन मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना न्याय देणे, कायम विनाअनुदानीत मधील "कायम" शब्द वगळून टाकणे,नौकरी महोत्सव आयोजित करणे आदी विषयांबाबत मनोगत व्यक्त केले.

               स्पर्धा परीक्षा,नौकरी महोत्सव आयोजित करणे, यासह विविध उपक्रम आयोजित केले जावू शकतात आणि पदवीधरांचे बळकटीकरण केले जावू शकते यासाठी  परळी शहरात ना.धनंजय मुंडे  व आ.सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली "पदवीधर भवन" उभारणी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे  वैजनाथ सोळंके,शिक्षक नेते अजय जोशी,शिवसेना नेते रमेश चौंडे,प्रा.डॉ.सुनिल चव्हाण,राहुल ताटे ,विनोद देशमुख  आदी  उपस्थित होते.



टिप्पण्या