MB NEWS:पंकजाताई मुंडे यांनी औरंगाबादच्या मेळाव्यात बुथ कार्यकर्त्यांत निर्माण केले नव चैतन्य!*

 


*राज्यात पुन्हा सत्ता आणण्याची सुरवात बोराळकरांच्या विजयापासून करा* 



*पंकजाताई मुंडे यांनी औरंगाबादच्या मेळाव्यात बुथ कार्यकर्त्यांत निर्माण केले नव चैतन्य!*


*'बिघाडी' च्या उमेदवाराला मतदार घरी बसविल्याशिवाय राहणार नाहीत* 


औरंगाबाद दि. २३ ---- पदवीधर मतदारसंघाची जागा आपल्या हक्काची आहे, ती पुन्हा जास्तीत जास्त मताधिक्य घेऊन आपल्या ताब्यात आणण्यासाठी कसोशीने मेहनत घ्यावी लागेल. 'तीन तिघाडी काम बिघाडी' सरकारच्या उमेदवाराला मतदार घरी बसविल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास व्यक्त करून राज्यात भाजपची सत्ता आणण्याची सुरवात शिरीष बोराळकर यांच्या विजयापासून करावी असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले.  


मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ तापडिया नाटयगृहात आयोजित बुथ कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होता. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, विजया रहाटकर, खासदार डाॅ. भागवत कराड, आ. अतुल सावे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाऊराव देशमुख, प्रवीण घुगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केनेकर, विजय औताडे, महिला मोर्चाच्या अमृता पालोदकर आदी यावेळी उपस्थित होते. 



  आपल्या भाषणात पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, पदवीधर निवडणूक आपल्या हातात आलेली आहे, फक्त आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल याकडे लक्ष देणं आवश्यक आहे.आपला उमेदवार कर्मचाऱ्यांच्या नव्हे तर कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणूक लढवत आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येकांनी फक्त आपापल्या बुथकडे लक्ष देऊन अधिकाधिक मतदान करून घ्यावे. जास्तीत जास्त मताधिक्य करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा लागली ही चांगली बाब आहे परंतू तरीही 'माझा युथ विजयी बुथ' या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करून बोराळकर यांना मताधिक्य द्यावे असं आवाहन त्यांनी केले.  



*हे सरकार आघाडीचे नव्हे तर बिघाडीचे*

---------------------

'तीन तिघाडी, काम बिघाडी' अशी एक मराठीत म्हण आहे, तसं राज्यातील सरकारचं झालं आहे. भाजपने जन सामान्यांसाठी राबविलेल्या योजना बिघडविण्याचे काम हे सरकार सध्या करत आहे, त्यामुळे तिघाडीच्या उमेदवाराला मतदार घरी बसविल्याशिवाय राहणार नाहीत. सत्ता असो वा नसो सामान्य जनतेच्या हक्कासाठी लढण्याचे लोकनेते मुंडे साहेबांचे संस्कार असल्याने आम्ही अतिवृष्टीचा दौरा करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, शिक्षकांचे, पदवीधरांचे प्रश्न सोडवले, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणण्याची सुरवात बोराळकर यांना विजयाचा गुलाल लावून करावी असे आवाहन करत आपल्या भाषणाने पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण केले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथ प्रमुख मोठया संख्येने उपस्थित होते.



••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार