MB NEWS:आशा व गटप्रवर्तक यांचे सप्टेंबर ऑक्टोबर चे मानधन व मानधनवाढीतील फरक दिवाळीपूर्वी देण्याची मागणी*

 *आशा व गटप्रवर्तक यांचे सप्टेंबर ऑक्टोबर चे मानधन व मानधनवाढीतील फरक दिवाळीपूर्वी देण्याची मागणी* 


*_अन्यथा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन_*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

   आशा व गटप्रवर्तक यांचे सप्टेंबर ऑक्टोबर चे मानधन व मानधन वाढीतील फरकाची रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात यावी अशी मागणी बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन च्या वतीने करण्यात आली आहे.अन्यथा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

    याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिवाळी सण तोंडावर असून या सणाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने मेहनत व सेवा बजावणाऱ्या आशा व गटप्रवर्तक यांच्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यातील मानधनाचा मोबदला व शासनाने जाहीर केल्यानुसार वाढीव मानधनाच्या फरकाची रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.अन्यथा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र बीड जिल्हा आशा वर्कर युनियन च्या वतीने देण्यात आला आहे.

    या निवेदनावर सिटु चे जिल्हा अध्यक्ष प्रा.बी.जी.खाडे, बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन चे जिल्हा अध्यक्ष शिवाजी कुरे, तालुकाध्यक्ष किरण सावजी, सुवर्णा आरसुळ,मायादेवी बनसोडे, प्रियंका घागरमाळे,रेखा वाघमारे,सुरेखा भिसे,सुलताना तांबोळी,खाजाजी शेख,सुषमा साखरे,मंगल गित्ते,संगीता मुंडे, सुनिता पवार, इंदुबाई कुकर, सुमित्रा पवार,हेमा काळे,अनिता गिराम आदींची नावे आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !