MB NEWS:जागृती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या विशेष कर्जसहाय्य योजनेचा सर्व सभासदांनी लाभ घ्यावा : प्रा. गंगाधर शेळके*

 *जागृती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या विशेष कर्जसहाय्य योजनेचा सर्व सभासदांनी लाभ घ्यावा : प्रा. गंगाधर शेळके*



*परळी (प्रतिनिधी)*...

  परळी शहराच्या आर्थिक पटलावरती नावलौकिक असणाऱ्या व आर्थिक क्षेत्रामध्ये यशाची विविध शिखरे गाठणाऱ्या जागृती ग्रुपच्या जागृती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीने आज 9/11/20 रोजी 10 व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण केले. सभासद संचालक मंडळ हितचिंतक कर्मचारी वर्ग आदींच्या उपस्थतीमध्ये मोठ्या उत्साहात वर्धापन दिन साजरा केला. वर्धापन दिनाचे औचित्य साधत सभासदांसाठी आगामी महिनाभरा करिता संस्थेच्या वतीने विशेष कर्जसहाय्य योजनेची घोषणा केली असुन या आकर्षक कर्जसहाय्य योजनेचा सर्व सभासदांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन यावेळी बोलताना जागृती ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक तथा जागृती मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सहकाररत्न प्रा. गंगाधर शेळके सर यांनी केले.


       याबाबत अधिक माहिती अशी की आर्थिक क्षेत्रामध्ये प्रगतीपथावरती असणाऱ्या जागृती ग्रुपच्या जागृती मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी या संस्थेची स्थापना दि 9/ 11/ 11 या साली करण्यात आली होती. संस्थेचा 9/11/20 रोजी 10 वा वर्धापन दिन अतिशय हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा गंगाधर शेळके हे होते. अध्यक्षस्थानाहून पुढे बोलताना त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत चा प्रवास विषद करत जागृती ग्रुप नेहमीच आर्थिक दुर्बल घटक व हातावर पोट असणाऱ्या लहान-मोठ्या व्यापाऱ्यांच्या मदतीला सदैव कसा तत्पर असतो याचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला. स्थापनेपासून यशस्वीरित्या दहाव्या वर्षांमध्ये पदार्पनाच्या निमित्ताने व कोरोना लॉक डाऊन अतिवृष्टी अशा विविध कारणामुळे मंदावलेली व्यापारी पेठेची नाजुक परिस्थिती पहाता जागृती मल्टीस्टेट च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत एका विशेष कर्ज सहाय्य योजनेची महत्वपूर्ण घोषणा त्यांनी यावेळी केली. सदरील योजनेमध्ये जागृती मल्टीस्टेट च्या सर्व सभासदांना आगामी एक महिन्याचा कालावधी दरम्यान संस्थेच्या वतीने जवळजवळ 20 शाखांमधून 12% एवढ्या नाममात्र व आकर्षक व्याजदराने कर्जपुरवठा करण्यात येणार असल्याचे व या योजनेचा लाभ अधिकाधिक सभासदांनी घ्यावा असे आवाहन व प्रतिपादन जागृती ग्रुपचे अध्यक्ष प्रा गंगाधर शेळके सर यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी सर्व संचालक मंडळ सर्व कर्मचारी वृंद तसेच सभासद हितचिंतक ठेवीदार आदींचे सर्वोतपरी सहकार्य व योगदानाबद्दल आभार मानत अभिनंदन केले. 



       या कार्यक्रमास वसंतराव सूर्यवंशी, दत्तात्रय सोळंके, प्रल्हाद सावंत (संचालक तथा एमडी जागृती पतसंस्था ), श्री हेमंत कुलकर्णी, बालाजी रामगिरवार, गोविंद भरबडे,सुधाकर शिंदे, दत्तात्रय चव्हाण, केदार देशमुख, श्रीरंग भाग्यवंत, रमेश लोखंडे, तेजस धुमाळ, गणेश कराड, राजेश मगर, सुनील चोभरकर आदींसह सभासद, कर्मचारी ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !