MB NEWS:कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अनंत जगताप यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन

 कामगार कल्याण मंडळ  कर्मचारी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अनंत जगताप यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन




प्रतिनिधी : (औरंगाबाद) 

 महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटना संलग्न भारतीय कामगार कर्मचारी महासंघ या संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अनंत जगताप यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन  करण्यात आले आहे.


महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस  अनंत जगताप हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे. या निमित्ताने शुक्रवार २७ नोव्हेंबर २०२०  रोजी दुपारी २ वाजता  मुंबई येथील कामगार कल्याण मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू गिरणी कामगार क्रीडा भवन सेनापती बापट मार्ग येथे कृतज्ञता सोहळा  संपन्न होणार आहे. 


 या कृतज्ञता सोहळ्याला भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेचे मानद सदस्य दिलीप दादा जगताप, कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज ईळवे यांची उपस्थिती राहणार आहे.


  अनंत जगताप यांनी पूर्णवेळ व अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक कामे केली. २००५ मधील कर्मचारी भरती संबंधी शासन व प्रशासनासह न्यायालयीन लढा देऊन अनेक कर्मचाऱ्यांचे संसार उध्वस्त  होण्यापासून वाचविले. कर्मचाऱ्यांना मंडळाच्या हितासाठी कार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले. 


कामगार कल्याण मंडळातील अर्धवेळ कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न ज्यामध्ये १० वर्ष पेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ तसेच अर्धवेळ कर्मचाऱ्यांचे वेतनात महागाई निर्देशांक नुसार वाढ करणे, अर्धवेळ कर्मचारी यांना पूर्णवेळ करणे आदी प्रश्नावर संघटनेच्या वतीने  सरचिटणीस अनंत जगताप यांनी  लढा दिला आहे.


कामगार कल्याण मंडळाचे कर्मचारी यांना ७ वे वेतन आयोग लागू करण्यासाठी अनंत जगताप हे संघटनेच्या माध्यमातून सतत प्रशासनासोबत संघर्ष करीत  राहिले.

 

कर्मचाऱ्यांच्या हिताचे कार्य केल्याने  त्यांचा चाहतावर्ग संपूर्ण राज्यभर आहे. या कृतज्ञता सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन , फेरोज खान,  विजय अहिरे , अफरोज अहमद,  वासे अहमद, स्वप्नील मोरे,  जी. एन. जाधव, नजरोद्दीन शेख, एस.व्ही. अवचार, नागेश कल्याणकर, संगमेश्वर जिरगे, डी.डी. रेणुके, संतोष जाधव यांनी केले आहे.

टिप्पण्या

  1. Sir ahet mhanun mandalatil karmchari Anand ahat matr tumachi univ hi asanar aahe saheb we will miss you shri jagtap sir

    उत्तर द्याहटवा
  2. श्री अनंत जगताप सर मुळेच आम्ही 2005 च्या भरती मधील लोक आज कामावर आहोत, त्यांच्यामुळे च आज आमचे सर्व कामे झालेली आहेत,,

    त्याच्या भावी आयुष्याच्या हार्दीक शुभेच्छा, त्यांना आरोग्यपूर्ण उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा ।

    नदीम शेख, बांधकाम शाखा, मधवर्ती कार्यालय, मुंबई

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार