MB NEWS:परळी - अंबाजोगाई रस्त्यावर आता आझाद चौक ते कन्हेरवाडी येथील पेट्रोल पंपापर्यंत होणार चौपदरीकरण*

 *परळी - अंबाजोगाई रस्त्यावर आता आझाद चौक ते कन्हेरवाडी येथील पेट्रोल पंपापर्यंत होणार चौपदरीकरण*



*चौपदरी रस्त्याची लांबी दोन किमी वाढविण्याचे धनंजय मुंडेंचे निर्देश*



*परळी शहरातील रेल्वे उड्डाणपुलाचेही होणार चौपदरी रुंदीकरण*


मुंबई (दि. २५) ---- : बहुप्रतिक्षित परळी ते अंबाजोगाई रस्त्याचे काम सध्या वेगाने प्रगतीपथावर असून, परळी शहरातील मौलाना आझाद चौक ते सपना हॉटेल इथपर्यंत मूळ आराखड्यानुसार चौपदरी रस्ता प्रस्तावित आहे, या परिसरातील रहदारीचा विचार करत चौपदरी रस्त्याची लांबी आणखी दोन किलोमीटर वाढवून कन्हेरवाडी येथील पेट्रोल पंपापर्यंत करण्याचे निर्देश आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. 


परळी - अंबाजोगाई रस्त्याच्या कामाची गती वाढविणे व अन्य रस्त्यांच्या कामांसंदर्भात धनंजय मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत महत्वपूर्ण बैठक घेऊन सूचना दिल्या. या बैठकीस राष्ट्रीय महामार्गचे सचिव विनयकुमार देशपांडे, कार्यकारी अभियंता स्वामी, सहसचिव रहाने, संबंधित एजन्सीचे कंत्राटदार आदी अधिकारी उपस्थित होते.


परळी शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीच्या दृष्टीने लहान पडत असून या उड्डाणपुलाच्या चौपदरीकरण करण्याचीही आवश्यकता असून याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात याव्यात असेही यावेळी धनंजय मुंडे म्हणाले. 


अंबाजोगाई रस्त्यावर येणाऱ्या कन्हेरवाडी गावात नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांना रहदारीचा त्रास होऊ नये यासाठी येथे रेक्युलर अंडरपास बांधण्यात यावेत असे निर्देशही धनंजय मुंडे यांनी संबंधित यांना या बैठकीत दिले आहेत. 



दरम्यान परळी ते अंबाजोगाई या रस्त्याचे आझाद चौकापासून चौपदरीकरण आणखी दोन किलोमीटर वाढवत कण्हेरवाडी येथील पेट्रोल पंपापर्यंत वाढवून, परळीच्या बाजूने अधिक वेगाने काम करण्यात येणार असून, श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाच्या चौपदरीकरण करण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार