MB NEWS:कोरोनाचे संकट दिव्यांच्या तेजोमय प्रकाशात हरवून एक नवीन आशादायी सोनेरी पहाट प्रकाशमान व्हावी -धनंजय मुंडे*

 *कोरोनाचे संकट दिव्यांच्या तेजोमय प्रकाशात हरवून एक नवीन आशादायी सोनेरी पहाट प्रकाशमान व्हावी -धनंजय मुंडे*

 


*दिपावली निमित्त जिल्हा वासीयांना दिल्या शुभेच्छा*


परळी वै. (दि. १३) ---- : दिपावलीचा सण आनंद व दीपोत्सवाचे पर्व असून या निमित्त सर्वांच्या आयुष्यात सुख, समृध्दी आणि आरोग्याचा प्रकाश तेजोमय व्हावा; जगावरील कोरोनारुपी संकट दिव्यांच्या तेजोमय प्रकाशात हरवून जावे आणि एक नवीन आशादायी सोनेरी पहाट सर्वांच्या आयुष्यात प्रकाशमान व्हावी, अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा वासीयांना व राज्यातील जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

धनत्रयोदशी निमित्त धन्वंतरी देवता प्रत्येकाच्या आयुष्यात आरोग्यसंपन्नता प्रदान करो, लक्ष्मी पुजनानिमित्त समृध्दी आणि भरभराटीने प्रत्येकाचे कौटूंबीक आयुष्य आनंदमयी व्हावे, दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेच्या गोडव्याच्या माध्यमातून कौटूंबीक व सामाजिक स्नेहसंबंध वृध्दिंगत व्हावेत तसेच दीपावलीचा आनंद स्नेह व सामाजिक ऐक्य रुजवणारा ठरावा अशी आशा ना.मुंडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशाद्वारे व्यक्त केली आहे.

बीड जिल्ह्यात कोरोनाचे आकडे मंदावले असले तरी धोका आणखी पूर्ण टळलेला नाही, बाजारपेठांमध्ये व रस्त्यांवर सणानिमित्त वाढणारी गर्दी या बाबत धनंजय मुंडे यांनी चिंता व्यक्त केली असून आपल्या व आपल्या कुटूंबाला सुरक्षित ठेवून सर्व शक्तीने कोरोनाला हरवणे यासाठी कोरोना विषयक योग्य त्या नियमांची खबरदारी घेणे मास्क वापरणे तसेच योग्य सामाजिक अंतर पाळणे या गोष्टी आणखी काही दिवसांसाठी नित्याच्या व सवयीच्या करुन घेण्याचे आवाहनही यानिमित्ताने ना.धनंजय मुंडे यांनी केले आहे.

दिव्यांच्या तेजोमय प्रकाशात कोरोनाची काजळी दूर व्हावी तसेच फराळ व मिठाईच्या गोडव्याने सामाजिक स्नेह वृध्दिंगत व्हावा या सदिच्छांसह नागरिकांना सुरक्षिततेचे आवाहन करत धनंजय मुंंडे यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार