MB NEWS:कोरोना निगेटिव्ह असाल तरच महाराष्ट्रात प्रवेश*

 💥💥💥

*कोरोना निगेटिव्ह असाल तरच महाराष्ट्रात प्रवेश*



दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातील प्रवाशांसाठी ठाकरे सरकारची नियमावली*

मुंबई: नवी दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. महाराष्ट्रात यायचं असेल तर सोबत कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आणावा. अन्यथा तुम्हाला आल्या पावली परत पाठवलं जाईल, असं राज्य सरकारने नव्या नियमावलीत नमूद केलं आहे. त्यामुळे या तिन्ही राज्यातील नागरिकांना महाराष्ट्रात येताना कोरोना निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्रं सोबत आणावं लागणार आहे.

दिवाळीनंतर दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रातही हा आकडा वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मिशन बिगीन अगेन अंतर्गत गोवा, दिल्ली, गुजरात आणि राजस्थानमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. विमान, रस्ते मार्ग आणि रेल्वे मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 25 नोव्हेंबरपासून हे निर्बंध लागू होणार असल्याचं नोटिफिकेशन्समध्ये नमूद करण्यात आलं आहे.

नव्या निर्देशानुसार उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली या राज्यातून महाराष्ट्रात विमान आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 72 तासाची कोव्हिड टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. तसेच दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात हवाई, रेल्वे व रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना कोविड आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत आणणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !