MB NEWS:परळीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाढीव विजबिल विरोधात महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी*


*परळीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाढीव विजबिल विरोधात महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी*



परळी वैजनाथ, दि. 23....             

लॉकडाऊन च्या कार्यकाळात सामान्य नागरिक व व्यापारी यांनी विजेचा वापर न करता महावितरण कडून आलेल्या आवा च्या सव्वा विजबिला मुळे सामान्य नागरिक व व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. आघाडी सरकार महावितरण कंपनी च्या माध्यमातून जनतेची लूट करत आहे म्हणून भारतीय जनता पार्टी च्या राष्ट्रीय सचिव  पंकजाताई मुंडे व महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षा खा . डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या आदेशाने परळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपकार्यकारी अभियंता महावितरण यांच्या कार्यालय समोर आज (दि.23) रोजी विजबिल होळी आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा परळीच्यावतीने महावितरण कंपनीचे शाखा अभियंता अंबाडकर यांना कंदील व पणती भेट देण्यात येऊन वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली. राज्य सरकारने वाढीव अव्वाच्या सव्वा विजे बिले नागरीकांना दिली आहेत. यामुळे सामान्य नागरीक प्रचंड त्रस्त झाला आहे. राज्य सरकारने वाढीव वीज बिल माफ करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा भाजपच्या वतीने देण्यात आला.


यावेळी सर्वश्री, भाजप तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, भा.ज.पा. किसान मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य उत्तम माने, भा.ज.पा प्रदेश महिला कार्यकारणी सदस्या डॉ. शालिनी कराड, जवाहर एज्युकेशन संस्थेचे सदस्य श्रीराम मुंडे, जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य राजेश गित्ते, भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य अ‍ॅड.अरुण पाठक, नगरसेवक प्रा.पवन मुंडे, संदीप लाहोटी, नितीन समशेट्टी, तानाजी व्हावळे, उमेश खाडे, राजेंद्र ओझा,नरेश पिंपळे, किरण धोंड,सरपंच अरुण दहिफळे,सरपंच माऊली साबळे,धनराज गीते,आश्विन मोगरकर,अनिश अग्रवाल, योगेश पांडकर, बाळासाहेब शिंदे, भीमराव हाके, गणेश होळंबे, गोविंद चौरे, शाम गित्ते, नितीन मुंडे, राजेेश कौलवार, पवन तोडकरी, दिपक कराड, गोपीनाथ गित्ते, विकास मुंडे, अभिजीत गुट्टे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येेने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार