MB NEWS:पंकजाताई मुंडे यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट* *शेतक-यांना दिलासा, नोकरभरती बाबत केली चर्चा; दिवाळीच्याही दिल्या शुभेच्छा*

 *पंकजाताई मुंडे यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट*


*शेतक-यांना दिलासा, नोकरभरती बाबत केली चर्चा; दिवाळीच्याही दिल्या शुभेच्छा*



मुंबई दि. ११ ----- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राजभवनात जाऊन सदिच्छा भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.


   पंकजाताई मुंडे यांनी यासंदर्भात ट्विट करून राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीची माहिती दिली. राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या पिकांचे फार मोठे नुकसान झाले होते. पंकजाताई मुंडे यांनी स्वतः शेतक-यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीची पाहणी केली होती, याबाबत त्यांनी राज्यपालांना माहिती दिली. राज्यातील कोरोनाची परिस्थिती, अतिवृष्टीतील शेतक-यांना दिलासा तसेच नोकरभरती या विषयावर त्यांनी राज्यपाल महोदयांनी चर्चा केली तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार