MB NEWS:पदवीधर निवडणुकीत पंकजाताईंचा प्रचाराचा झंझावात

 *क्रीडा क्षेत्रातील पदवीधरांशी पंकजाताई मुंडे यांचा औरंगाबादेत संवाद*


*क्रीडा विद्यापीठ पुन्हा स्थापण्यासाठी प्रयत्न करण्याचा दिला शब्द* 



_शिरीष बोराळकर यांना मताधिक्याने विजयी करण्याचा क्रीडापटूंनी केला संकल्प_



औरंगाबाद दि. २३ ------ मराठवाडयातील क्रीडा आणि शिक्षण क्षेत्राचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. याठिकाणी आमच्या सरकारच्या काळात मंजूर झालेले क्रीडा विद्यापीठ पुण्याला स्थलांतरित करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे, आता ते विद्यापीठ पुन्हा मराठवाडयात परत आणून इथल्या क्रीडा क्षेत्राला नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असा शब्द भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शहरातील पदवीधर क्रीडापटूंना दिला. 



  मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ हाॅटेल अतिथीच्या सभागृहात शिक्षक, प्राध्यापक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, रणजीपटू, विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडू यांच्याशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या. खासदार डाॅ. भागवत कराड, प्रवीण घुगे, संजय केनेकर, विवेक देशपांडे, किशोर शितोळे, ऑलिम्पिक संघटनेचे पंकज भारसाकळे, बापू घडामोडे, प्रशांत देसरडा, समीर राजूरकर, सविता कुलकर्णी, दिपक ढाकणे आदी यावेळी उपस्थित होते. 



  पुढे बोलतांना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, मराठवाडयातील वेगवेगळ्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका आपण सत्तेत असताना घेतली होती. इथल्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार सारखी योजना तसेच स्त्री जन्मदर वाढीसाठी योजना आखून जनजागृती केली. शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचा निर्णय अनेकांच्या फायद्याचा ठरला. दुष्काळ, जलसंधारण, औद्योगिक क्षेत्रासाठी जसे काम झाले तसे क्रीडा व शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी झाले पाहिजे, आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. इथले क्रीडा विद्यापीठ पुण्याला स्थलांतरित करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला असून तशी घोषणा केली आहे पण ते पुन्हा परत आणण्याचा माझा प्रयत्न राहील, त्यासाठी मुख्यमंत्र्यांना बोलू असा शब्द त्यांनी दिला.


  शिरीष बोराळकर हे क्रीडा क्षेत्राशी संबंधित म्हणजे तुमच्यातीलच एक आहेत त्यामुळे त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केले.


*खेळाडूंशी दिलखुलास संवाद*

----------------------

पंकजाताई मुंडे यांनी यावेळी उपस्थित खेळाडूंशी दिलखुलास संवाद साधला. शारीरिक शिक्षकांचे प्रश्न, क्रीडा विद्यार्थ्यांच्या समस्या, क्रीडांगण, शैक्षणिक गैरसोयी तसेच विविध प्रश्नांवर मान्यवर खेळाडूंनी मांडलेल्या समस्यांना पंकजाताई मुंडे यांनी समाधानकारक उत्तरे देऊन त्या सोडविण्याचा शब्द यावेळी दिला.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !