MB NEWS-रस्त्यावर फटाके फोडल्यास कठोर कारवाई दिवाळीच्या फटाक्यांना यंदा फटका !

 रस्त्यावर फटाके फोडल्यास कठोर कारवाई

दिवाळीच्या फटाक्यांना यंदा फटका !



मुंबई :सणानंतर आता दिवाळी सणावरही कोरोनाचे सावट कायम राहिल्याने यंदाची दिवाळीही फटाक्याविना साजरी करावी लागणार आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर फटाके फोडल्यास साथ नियंत्रण कायद्याखाली कठोर कारवाई करणार आहे. मुंबई मनपा लवकरच याबाबची नियमावली जारी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरवर्षी दिवाळी सण उत्साहात साजरा केला जातो. आठ दिवसाआधीच ठिकठिकाणी फटाके विक्रीची दुकाने थाटली जातात. त्यामुळे दिवाळी आधीच फटाके खरेदी करणा-यांची गर्दी होते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे मागील सात महिन्यांपासून विविध सण साजरा करताना सरकारने निर्बंध घातले आहे. त्यामुळे नियमांची अंमलबजावणी करून सण साजरे करण्यात आले. कोरोना नियंत्रणात असला तरी संकट अजूनही कायम आहे. दिवाळी सणात वाढणारी गर्दी व याचवेळी थंडी असल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक असल्याने सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढू नये, सोशल डिस्टनसिंगच्या नियमाचे पालन व्हावे यासाठी निर्बंध घातले जाणार आहेत. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण, खरेदीसाठी बाजारात होणा-या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने कडक नियमावली तयार केली जाणार आहे.


या पार्श्वभूमीवर फटाके विक्री व रस्त्यावर फटाके फोडण्यास बंदी घातली जाणार आहे. त्यामुळे यंदा फटाकेविना दिवाळी साजरी करावी लागणार आहे. रस्त्यावर फटाके फोडताना दिसल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. मुंबई महापालिका याबाबत लवकरच नियमावली जारी करणार आहे. नियमाचे उल्लंघन करणा-यास साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणे महागात पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणांवर, रस्त्यांवर फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्याचे धोरण पालिकेने आखले आहे. येत्या दोन दिवसांत याबाबतची मार्गदर्शक तत्वे जाहीर केले जातील, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार