MB NEWS:भाजप सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी धरपडणारा पक्ष ; बोराळकरांना विजयी करून भाजपला साथ द्या उदगीर आणि अहमदपूरच्या पदवीधर मतदार मेळाव्यात खा.प्रितमताई मुंडे यांचे मतदारांना आवाहन

 भाजप सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी धरपडणारा पक्ष ; बोराळकरांना विजयी करून भाजपला साथ द्या

उदगीर आणि अहमदपूरच्या पदवीधर मतदार मेळाव्यात खा.प्रितमताई मुंडे यांचे मतदारांना आवाहन

उदगीर/अहमदपूर.दि.२८-----भाजप हा सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी धरपडणारा पक्ष आहे.राज्यातील जनतेचे प्रश्न आणि पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपला साथ देऊन शिरीष बोराळकर यांना विजयी करण्याचे आवाहन भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि बीडच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केले आहे.पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक निमित्त भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित मतदार मेळाव्यात त्या बोलत होत्या.
भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारानिमित्त उदगीर आणि अहमदपूर येथे पदवीधर मतदारांचा मेळावा पार पडला.यावेळी मंचावर खा.सुधाकर शृंगारे, आ.रमेश अप्पा कराड,मा.आ.गोविंद अण्णा केंद्रे,मा.आ.सुधाकर भालेराव,नागनाथ निडवदे,जी.प.अध्यक्ष राहुल केंद्रे,बापूसाहेब राठोड,बसवराज बागबेदे,सुधीर भोसले,बसवराज रोडगे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मतदारांना संबोधित करताना खा.मुंडे म्हणाल्या की पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने परिवर्तनाची सुरुवात करून राज्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे सरकार आणायचे आहे.पदाला न्याय न देऊ शकणाऱ्यांना मत देऊन आपले मतदान वाया घालवू नका,तुमच्या समस्या सोडवण्याची जवाबदारी भारतीय जनता पक्ष घेत आहे.सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला साथ देऊन भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांना विजयी करा" असे आवाहन त्यांनी केले.
तसेच महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभाराचा देखील त्यांनी यावेळी जोरदार समाचार घेतला.राष्ट्रवादी हा ‘ढ' विद्यार्थ्यांचा पक्ष असून भाजप मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचा पक्ष आहे.राज्यात राज्यात महिला अत्याचाराचा घटना वाढल्या आहेत.शेतकऱ्यांना मदत मिळत नाही,लोकहिताच्या योजना रद्द केल्या जात असल्याची टीका खा.प्रितमताई मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.
⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !