MB NEWS:*एका तासात एसटी कर्मचाऱ्यांचे एका महिन्याचे वेतन देणार : अनिल परब*

 ⭕⭕⭕

*एका तासात एसटी कर्मचाऱ्यांचे एका महिन्याचे वेतन देणार : अनिल परब*



मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना लगेच एका महिन्याचं वेतन देणार, सणासाठी कर्मचाऱ्यांना अग्रिम रक्कम तात्काळ देणार आहोत, अशी परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, अजून एका पगाराची व्यवस्था दिवाळी आधी करण्याचा प्रयत्न आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये, आम्ही त्यांच्या वेतनासाठी बॅंकेकडे कर्ज देखील मागितले आहे, असं परब यांनी सांगितलं. आज एका तासात कर्मचाऱ्यांना एका महिन्याचं वेतन मिळेल, त्यामुळं त्यांनी आत्महत्येसारखं पाऊल उचलू नये, असं आवाहन परब यांनी केलं.

यावेळी परब म्हणाले की, आत्महत्यासारखं कठोर पाऊल उचलू नका. तात्पुरत्या संकटातून आपण नक्की मार्ग काढू. दुःखी होऊन असं कोणत्याही टोकाचं पाऊल घेऊ नये. कुटुंबाला त्याचा त्रास होतो. कुटुंब रस्त्यावर येतं. दिवाळी आधी 1 पगार मिळेल आणि दिवाळीनंतर 1 पगार मिळेल, असं परब म्हणाले.

परब म्हणाले की, पूर्णपणे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आम्ही वेतनासाठी बँकेकडे कर्ज पण मागितलं आहे. टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी होतील. आज 1 तासात 1 पगार आणि सणाचा अनुग्रह मिळेल. आम्ही राज्य शासनाकडे एकरकामी पैसे मागितले आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बोलणं सुरू आहे. आता एसटी साठी कोणतंही रक्कम थकीत नाही. राज्य शासनाला प्रस्ताव दिलाय की काही दिवस तरी कर्मचाऱ्यांना पगार द्यावे. त्यामुळं पैसे आणण्याची साधनं वाढवण्यास मदत होईल, असं परब यांनी सांगितलं.

एस टी ला राज्यशासनाने मदत केली आहे यापुढेही करेल. पैशांची तजवीज करायला हवी. आज सकाळपासून त्याबाबत बैठक सुरू आहे. 1 पगाराचा प्रश्न सुटला आहे आणि 1 पगाराचा प्रश्न दिवाळीपर्यंत सुटेल. अनेक माध्यमातून पैसे एस टी मध्ये येईल याची प्रयत्न सुरू आहेत. पगार आणि डिझेलमध्ये पैसे खर्च होतात. एक रकमी पैसे आले तर पुढचं प्लानिंग सोप्पं होईल, असं ते म्हणाले.

एसटी कामगार संघटनेचं राज्यभर आक्रोश आंदोलन

एसटीच्या एक लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेनं आज राज्यभर आक्रोश आंदोलन केलं. कोरोनाच्या काळात सोयी-सुविधांचा अभाव असताना एसटी कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. त्यामुळं एसटी महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोना बाधितही झालेत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही काम करत असताना या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचं वेतन मिळालं नाही. त्यामुळं आज एसटी कर्मचाऱ्यांनी घरासमोरच कुटुंबियांसमवेत आक्रोश आंदोलन केलं आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार