MB NEWS:परळीतील शाळांनी कोविडविषयक नियमांची अंमलबजावणी करत विद्यार्थ्यांचे केले स्वागत.....

 परळीतील शाळांनी कोविडविषयक नियमांची अंमलबजावणी करत विद्यार्थ्यांचे केले  स्वागत.....

इमदादुल उलूम माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा



आज दिनांक 23/11/2020 सोमवार रोजी सोशल डिस्टंसिंग च्या सर्व नियमांचे पालन करून इमदादुल उलूम माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा भरवली गेली. शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता नववी, दहावी, अकरावी व बारावी वर्गाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीं मोठ्या संख्येत उपस्थित होते.उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे टेंपरेचर मशीन ने स्कॅनिंग करण्यात आले. तसेच ऑक्सी मीटरने विद्यार्थ्यांची ऑक्सिजन पातळी ही तपासण्यात आली. विद्यार्थ्यांना मास्क वाटप करण्यात आले व त्यांचे हात सॅनीटाईज करून शाळेत प्रवेश दिला गेला. शाळेत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पालकांच्या संमतीसाठी संमती पत्र व हमी पत्र देण्यात आले.दिनांक 20/11/2020 रोजी इमदादुल उलूम माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकांची RTPCR चाचणी करण्यात आली. यात सर्व शिक्षकांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.

अभिनव विद्यालय.....


अभिनव विद्यालयात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेवून ९वी व१०वी चे वर्ग सुरू

परळी -प्रतिनिधी _ ज्ञान प्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय नेहरू चौक परळी येथे राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे वर्ग नववी व दहावी ची शाळा संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन सुरू करण्यात आली शाळा भरण्याअगोदर सर्व खोल्या व परिसराची स्वच्छता करण्यात आली त्यानंतर सॅनिटाइजरची फवारणी करण्यात आली वर्ग नववी व दहावी विद्यार्थ्यांमध्ये शाळेत येण्यासाठी अर्धा तास वेळेचा फरक ठेवण्यात आला होता कारण एकदाच गर्दी होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली होती शाळेत प्रवेश करताना सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी सॅनिटाइजरने हात धुऊन व थर्मल मशीनगणने तापमान मोजून शाळेत प्रवेश दिला वर्गामध्ये विद्यार्थ्यांची बसण्याची सोय एक मीटर अंतरावर करण्यात आली होती तसेच शाळेत जाताना येताना एकमेकाशी अंतरावरून बोलणे व इतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या अशाप्रकारे पहिल्या दिवसाची सुरुवात झाली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !