इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS: गेवराई,अतिवृष्टीची मदत देताना पक्षपातीपणा का..??-पूजा मोरे

 अतिवृष्टीची मदत देताना पक्षपातीपणा का..??-पूजा मोरे



गेवराई, प्रतिनिधी...


बीड जिल्ह्यात पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्यात गेवराई तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याने मंत्र्यांचे पाहणी दौरे याच भागात झाले.परंतु मंत्र्यांनी पाहणी केलेले मादळमोही व तलवाडा हे महसूल मंडळ अतिवृष्टीतुन वगळण्यात आले आहे.त्यामुळे मंत्र्यांचे दौरे फक्त फोटो पुरते होते का ?असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी केला आहे.


बीड जिल्ह्यातील 118 गावातील एक लाख 16 हजार 865 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तर एकूण 90 हजार 730 हेक्‍टर जिरायती क्षेत्रातील पिकांचे तर बागायती क्षेत्रातील 556 हेक्‍टरवर नुकसान झाले तसेच 87 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले जिल्ह्यात एकूण 90 हजार 3376 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.तर सोयाबीन,बाजरी, तूर, कापूस, ऊस, मूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.


त्यानुसार शासनाने अतिवृष्टीचे 10,000 कोटींचे पॅकेज जाहीर केले परंतु ज्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मादळमोही व तलवाडा या भागात डझनभर मंत्र्यांनी पाहणी दौरे केले त्या भागात शेतकऱ्यांच्या शेतात अगदी गुडघ्यापर्यंत पाणी होते.कापसाच्या वाती झालेल्या होत्या,मका व सोयाबीनला कोंब फुटले होते.तोच भाग अतिवृष्टीच्या निकषातुन वगळण्यात आला आहे. त्यामुळे अतिवृष्टी ची मदत देताना पक्षपातीपणा करून सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे का? आणि शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करून प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.


तेव्हा शासनाने जाहीर केलेल्या "अतिवृष्टीग्रस्त" मंडळात बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मादळमोही व तलवाडा या मंडळाचा समावेश करून सरसकट NDRF ची मार्फत मिळणारी 6800रु/हेक्टरी व SDRF मार्फत मिळणारी 3200रु/हेक्टरी नुकसानभरपाई तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी केली आहे. या दोन्ही मंडळांना अतिवृष्टी मध्ये ग्राह्य धरून तात्काळ नुकसान भरपाई न दिल्यास शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!