परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:*💥कोरोनावर लस येत नाही, तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत; दिल्ली सरकारनं थेट घोषणाच केली!*

 *💥कोरोनावर लस येत नाही, तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत;

दिल्ली सरकारनं थेट घोषणाच केली!*             

         ----------------------------------- 



  दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी मोठी घोषणा केलीय. कोरोनावर लस येत नाही, तोपर्यंत दिल्लीतील शाळा सुरू होणार नाहीत, असं सिसोदिया यांनी जाहीर केलंय.       कोरोनाच्या उद्रेकामुळे संपूर्ण देशभरात मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. तर काही ठिकाणी शाळा पुन्हा सुरू करण्यासाठीचे प्रयत्न देखील केले गेले. मात्र कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत असल्याची परिस्थितीपाहून शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे देखील घेण्यात आला आहे. दिल्लीतील बहुतेक पालक शाळा सुरू करण्याच्या विरोधात असल्याचं सिसोदिया यांनी ३० ऑक्टोबर रोजी म्हटलं होतं. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत दिल्लीतील शाळा बंदच राहतील अशी घोषणा सिसोदिया यांनी केली होती. आता सिसोदिया यांनी थेट जोवर लस येत नाही तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत अशी भूमिका घेतली आहे. ''आम्ही सतत पालकांच्या संपर्कात आहोत आणि त्यांचं मत जाणून घेत आहोत. शाळा सुरू करण्यासाठी सध्याचं वातावरण योग नसल्यानं सर्वजण साशंक आहेत. ज्या ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या तिथं विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे दिल्लीतील शाळा पुढील आदेशापर्यंत बंदच राहतील'', असं सिसोदिया यांनी स्पष्ट केलं आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!