MB NEWS: *प्रा. टी.पी. मुंडे धावले एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीला;आरोग्य प्रशासन झाले खडबडून जागे*

 *प्रा. टी.पी. मुंडे धावले एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीला;आरोग्य प्रशासन झाले खडबडून जागे*



*परळी आगारातील 62 एसटी कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी ;एसटी कर्मचाऱ्यांनी मानले आभार!*



परळी प्रतिनिधी


बीड जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांना बेस्ट वाहतूक सेवेसाठी मुंबई येथे बेस्ट वाहतूक करण्यासाठी टप्प्याटप्प्याने बोलावले जात आहे त्यात आपले कर्तव्य बजावून परळी आगारातील सुमारे 62 एसटी कर्मचारी रविवारी परत आले असता त्यांची कोरोना चाचणी करण्यास परळी येथील शासकीय रुग्णालयातील आरोग्य प्रशासन टाळाटाळ करत होते मात्र या कर्मचाऱ्यांनी  प्रा.टी.पी. मुंडे (सर) यांच्याकडे धाव घेतली व त्याच तत्परतेने एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीला ते धावून आले आणि आरोग्य प्रशासनाला फोन केल्यानंतर आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आणि या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी संपन्न झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.



    राज्य परिवहन महामंडळ कार्यालय बीड येथील विभाग नियंत्रक यांना एका निवेदनाद्वारे या कर्मचार्यां विषयी काय उपाय योजना करणार आहात असा सवाल केला दरम्यान परळी येथील उपविभागीय अधिकारी, जिल्हा चिकित्सक आधिकारी व परळी शासकीय रुग्णालयातील अधिक्षक यांनासुद्धा फोन करून या कर्मचाऱ्यांना विषयी माहिती दिली. या एसटी कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक असताना ती का केली जात नाही याची जबाबदारी कोणाची आहे अशा प्रश्नांचा त्यांनी भडिमार केला तसेच त्यांच्या कुटुंबाचे देणे-घेणे आहे की नाही आणि या कर्मचार्‍यांची काळजी प्रशासनाला आहे का असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.


     दरम्यान मुंबई येथे पाठवण्यात आलेल्या 400 कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 189 कर्मचाऱ्यांना कोरोना ची लागण झाली आहे त्यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे अगोदरच अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील ग्रामीण व शहरी भागातील एसटीची वाहतूक विस्कळीत झाली आहे त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरील ग्रामीण व शहरी भागात बस सेवा तात्काळ सुरू करावी जिल्ह्यातल्या ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांचे गैरसोय करून मुंबई येथील लोकांची सोय करणे अयोग्य आहे आठ दिवसाच्या आत जिल्ह्यात बस सेवा सुरु करा अन्यथा जन आंदोलन उभारले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे तसेच या कर्मचाऱ्यांना मुंबई येथे बेस्टच्या वाहतुकीसाठी पाठवू नये अशी विनंतीही त्यांनी केली आहे.



    दरम्यान कर्तव्य बजावत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचे दुर्दैवाने बरेवाईट झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे या सर्व कर्मचाऱ्यास आरोग्य सेवा आणि या काळातील त्यांच्या हजेरी ग्राह्य धराव्यात अशी विनंतीही त्यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, मा.उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई ,मा. परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई ,मा.पालकमंत्री बीड,माजी पालकमंत्री बीड मा.विभाग नियंत्रक बीड ,आणि परळी आगार प्रमुख यांना देण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार