MB NEWS:उद्यापासून आंबेजोगाई यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाला प्रारंभ

उद्यापासून आंबेजोगाईत यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाला प्रारंभ




अंबेजोगाई -

महाराष्ट्रात कला, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटविणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे हे ३६ वे वर्ष असून या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३ दिवस ऐवजी दोन दिवस समारोह होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन बुधवार आज दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईतील तरुण पत्रकार व वार्षिक रिंगण व कोलाज डॉट इन चे संपादक सचिन परब यांच्या हस्ते या दोन दिवसीय समारोहाचे उद्घाटन होणार आहे.

 उद्घाटन समारंभानंतर रात्री ७…३० वाजता कवी संमेलनाचे आयोजन केले असून अध्यक्षस्थानी उद्धव कानडे असतील तर बुलढाणा साखरखेर्डा येथील अजीम नवाज राही हे सूत्रसंचलन करणार आहेत. त्याचबरोबर पुण्याचे पुरुषोत्तम सदाफुले, तुळजापूरचे नारायण पुरी, डोंबिवलीचे आनंद पेंढारकर, पेणचे विनायक पवार, नांदेडच्या डॉ. सुजाता जोशी- पाटोदेकर आणि नायगाव बिलोलीचे शंकर राठोड यांचा सहभाग राहणार आहे रसिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी केले आहे.  

कोविड १९ च्या अनुशघाने शासनाचे सर्व नियम व अटींचे पालन करून कार्यक्रमाच्या स्थळी सॅनिटायझर, बॉडी टेपंरेचर व ऑक्सामीटर ने तपासणी केली जाईल. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक मीटरचा अंतर ठेवून बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह आंबेजोगाई या फेसबुक पेज वरून लाईव्ह केले जाणार आहे. हा कार्यक्रम वेणूताई चव्हाण महाविद्यालयातील भगवानरावजी लोमटे सभागृहात होणार आहे. कार्यक्रम वेळेवर सुरू होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार