MB NEWS:शिक्षण सेवक पद भरतीचा मार्ग मोकळा -शिक्षणमंत्री 💢 सुमारे 6 हजार पदे भरणार💢

 शिक्षण सेवक पद भरतीचा मार्ग मोकळा -शिक्षणमंत्री



   💢  सुमारे 6 हजार पदे भरणार💢

मुंबई...

महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील ‘शिक्षण सेवक’ पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.


कोविड-19 या संसर्गजन्य रोगामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांवर वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने घालण्यात आलेल्या पदभरती बंदीतून ‘शिक्षण सेवक’ पदभरती प्रक्रिया वगळ्यात आली आहे. अशी माहिती राज्य शासनाच्या कक्ष अधिकाऱ्याकडून राज्याच्या शिक्षण आयुक्तांना एका शासन आदेशातून देण्यात आली आहे.या संदर्भात राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून माहिती जाहीर केली आहे. ‘उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे पवित्र पोर्टलदवारे उर्वरीत सुमारे 6 हजार पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होत आहे.’ असेही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार