युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS: *पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीनेही गळफास घेऊन केली आत्महत्या* • _परळी तालुक्यातील पांगरी कॅम्प येथील घटना_ •

 *पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीनेही गळफास घेऊन केली आत्महत्या*




• _परळी तालुक्यातील पांगरी कॅम्प येथील घटना_ •

    परळी - तालुक्यातील पांगरी कॅम्प येथे नवविवाहितेचा विषारी द्रव्य प्राशन केल्याने मृत्यू झाला. तर यानंतर काही तासात तिच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली आहे. प्रियंका सायस पंडित (वय 19.) आणि सायस पंडित (25 ) अशी मृत पती -पत्नीचे नाव आहेत. 

         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीने विष घेऊन तर पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे.  या घटनेची माहिती मिळताच तात्काळ  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर दोघांनीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर आलं नाही. 

        दरम्यान, या घटनेचा अधिक तपास परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे हे करीत आहेत. या जोडप्याच्या अशा अकाली जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या