MB NEWS:जिल्हा नियोजन समितीच्या अंबाजोगाई तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी दत्ता आबा पाटील यांची नियुक्ती* *धनंजय मुंडेंचा सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा यशस्वी प्रयोग!*

 *जिल्हा नियोजन समितीच्या अंबाजोगाई तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी दत्ता आबा पाटील यांची नियुक्ती*



*धनंजय मुंडेंचा सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा यशस्वी प्रयोग!*


बीड/अंबाजोगाई (दि. ०८) ---- : बीड जिल्हा नियोजन समितीच्या अंबाजोगाई तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता आबा पाटील यांची नियुक्ती केली आहे.


महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना व जिल्हा नियोजन समितीच्या समन्वय समितीच्या नियुक्त्यांमधून धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्यातील सर्व घटक, पदाधिकारी यांना न्याय देण्याच्या दृष्टीने सोशल इंजिनिअरिंगचा यशस्वी प्रयोग केल्याचे या नियुक्त्यांमधून दिसून येते.


ग्रामीण भागाचा सर्वांगीण व व्यापक विकास साधण्याच्या उद्देशाने समाजातील अविकसित स्तराचा विकास साधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा समन्वय व पुनर्विलोकन साधून योग्य पद्धतीने कार्यान्वित करण्यात याव्यात याकरिता ही समन्वय समिती स्थापन करण्यात येते.


दरम्यान ना. मुंडे यांच्या निर्देशानुसार दत्ता आबा पाटील यांची अध्यक्ष पदी तर आ. संजय दौंड, पंचायत समितीच्या सभापती सौ. विजयमाला जगताप, खरेदी विक्री संघाचे बालासाहेब सोळंके, औदुंबर मोरे, अर्जुन वाघमारे, जयप्रकाश (बाळासाहेब) सोनवणे, सचिन (बाळासाहेब )देशमुख, सखाराम टेकाळे, सौ. शिलाबाई सोमवंशी, सौ. सविता कोकरे यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.


शासन नियमानुसार अंबाजोगाईचे तहसीलदार हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार असून या समितीची बैठक आयोजित करण्याची जबाबदारीही तहसीलदार यांची असेल. दरम्यान ग्रामीण भागातील व्यापक विकासाच्या योजनांचा लाभ सर्वार्थाने समाजातील गरजू घटकांपर्यंत पोचवण्यासाठी या समितीने काम करावे या सुचनेसह सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !