परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:मुंडे साहेबांच्या जयंतीदिनी* *रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करा* - *पंकजाताई मुंडे यांचे आवाहन*

 *मुंडे साहेबांच्या जयंतीदिनी*

*रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करा* -

*पंकजाताई मुंडे यांचे आवाहन* 



*कोरोनाचे नियम पाळून गोपीनाथ गडावर होणार दर्शन ; पंकजाताई स्वतः उपस्थित राहणार ; गर्दी टाळून सर्वांनी काळजी घेण्याची केली सूचना*


परळी दि. १० -------  कोरोना महामारीच्या संकटात सामाजिक उपयोगता आणि आवश्यकता लक्षात घेऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करावेत आणि १२ डिसेंबर हा जन्मदिवस  साजरा करावा असं आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. यंदा गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळावी, सर्वांनी स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे.


  यासंदर्भात समाज माध्यमाद्वारे दिलेल्या संदेशात पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, १२ डिसेंबर हा दिवस आपल्या सर्वांना अत्यंत प्रेरणा, उर्जा व जीवनामध्ये आशा देणारा दिवस आहे. मुंडे साहेब हयात असताना आपण सर्व हा दिवस वेगवेगळ्या पध्दतीने व उत्साहाने साजरा करतो होतो. आज ते हयात नाहीत, परंतू आपल्यासाठी ते स्वाभिमानाची प्रेरणा देणारे संघर्षाचा महामेरू आहेत. १२ डिसेंबर हा जन्मदिवस आणि ३ जून हया स्मृतीदिनी आतापर्यंत गोपीनाथ गडावर मोठ मोठे नेते, मंत्री, विविध क्षेत्रातील मान्यवर, छत्रपती उदयनराजे व संभाजीराजे आदींनी उपस्थित राहून संघर्षाच्या या जीवन प्रवासाला आदरांजली अर्पण केली. यंदा मात्र दरवर्षी सारखा मोठा कार्यक्रम नसणार आहे.


*रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करा*

---------------------------

यंदा  सर्व सामान्य जनता कोरोनाच्या संकटात सापडली आहे, अशा परिस्थितीत कोणालाही त्रास न होता वेगळ्या पध्दतीने १२ डिसेंबर हा दिवस साजरा करायचा आहे. मोठे नेते, मोठी सभा, गर्दी टाळायची आहे. मी स्वतः १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर सकाळी ११ ते २ वा. पर्यंत उपस्थित राहणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून सर्वांनी गडावर दर्शन घ्यायचे आहे. महामारीच्या या संकटात सामाजिक उपयोगता आणि आवश्यकता लक्षात घेऊन सर्वांनी १२ ते १५ डिसेंबर दरम्यान ठिक ठिकाणी केवळ आणि केवळ रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, असल्याने मुंडे साहेबांच्या जन्मदिवशी असे समर्पित कार्यक्रम घ्यावेत व त्याचे फोटो आणि कार्यक्रमाचे वर्णन सोशल मिडियावर द्यावेत असं आवाहनही पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!